सोनवडे-बांबवडे येथील अथणी शुगर्सच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले.
पाटील म्हणाले, गतवर्षी २९०० रुपये दर दिला आहे. ऊस वाहतूक, कंत्राटदार यांची सर्व बिले अदा केलेली आहेत, तसेच ऊस उत्पादकांना प्रतिटन एक किलो दीपावलीला साखर दिली जाणार आहे.
मानसिंगराव गायकवाड म्हणाले, कारखाना आता नावारूपाला येऊ लागला आहे. नवीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी ज्येष्ठ संचालक महादेवराव पाटील, अथणीचे युनिट हेड रवींद्र देशमुख, संचालक पंडितराव शेळके, कार्यकारी संचालक भगवान पाटील, सर्जेराव पाटील, प्रल्हाद पाटील, ए. ए. पाटील, दशरथ पवार, नितीन सुतार, सुजय पाटील, जगन्नाथ जोशी उपस्थित होते.
१० अथणी
फोटो : अथणी शुगरच्या मिल रोलर पूजनप्रसंगी उपस्थित उदय साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, रवींद्र देशमुख, महादेवराव पाटील, पंडितराव शेळके आदी उपस्थित होते.