लोकमत न्यूज नेटवर्क .
बांबवडे : अथणी शुगर्स लिमिटेड शाहूवाडी युनिटने चालू गळीत हंगामाच्या अखेरपर्यंत गाळपास आलेल्या उसाची २९०० रुपयेप्रमाणे सर्व बिले जमा करत ४ लाख ३६ हजार ११० मेट्रिक टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे, अशी माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
यावेळी योगेश पाटील म्हणाले, कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम राखली असून तोडणी वाहतूकदार यांचीही बिले अदा केली आहेत. १४३ दिवसांच्या हंगामात १२.२५ रिकव्हरीने ५ लाख ३६ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. तसेच ऊस गाळपास आलेल्या प्रती टनास एक किलो साखरही देण्यात येणार आहे.
पुढील हंगामासाठी लवकरात लवकर वाहनांचे करार करून घ्यावेत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची नोंद करावी, असे आवाहन योगेश पाटील यांनी केले. यावेळी युनिट हेड रवींद्र देशमुख, आनंदराव पाटील, सर्जेराव पाटील, प्रल्हाद पाटील, स्वप्निल देसाई, सुजय पाटील, दशरथ पवार, जयसिंग पवार, आदी उपस्थित होते. फोटो - ०८योगेश पाटील.