सातव्या वेतन आयोगासंदर्भातील बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. प्रश्न चिघळला जाऊ नये म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पगार वाढ आता झाली आहे, यापुढील काळात महापालिकेचे उत्पन्न वाढविणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. तुम्ही उत्पन्न वाढविण्यात कमी पडला तर अडचणी येतील याचाही विचार करा, असे आवाहन आमदार जाधव यांनी कर्मचाऱ्यांसमोर बोलताना केले.
मंत्री पाटील, मुश्रीफ यांचे आभार
वेतन आयोगाचा तिढा सोडविण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
फोटो क्रमांक - ३११२२०२०-कोल-केएमसी मिटींग
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, विजय वणकुद्रे, विजय चरापले उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)