कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलसमोरील खाद्यपदार्थ विक्रेत्याचे रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना संबंधित विक्रेत्याने महापालिका कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अजित पांडुरंग पोवार व भरत राजाराम बेबीतकट्टी (दोघे रा. बिंदू चौक) यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक झाली आहे.
शुक्रवारी शहरात करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक सबजेल या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. सबजेलसमोर अजित पोवार याने रस्त्यावर अतिक्रमण करून खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल लावला होता. जेव्हा कर्मचारी तेथे गेले त्यावेळी तेथे महिला होत्या. त्यांना अतिक्रमण काढून घ्या म्हणून सूचना देण्यात आली; परंतु त्यांनी ते काढून घेतले नाही. उलट महिलांनी फोन करून अजित पोवार याला तेथे बोलावून घेतले. तोपर्यंत कर्मचा-यांनी स्टॉलवरील टेबल, खुर्च्या तसेच अन्य साहित्य जप्त करून ट्रकमध्ये भरले.
हा ट्रक बिंदू चौक येथे नेऊन लावण्यात आला. तोपर्यंत पोवार तेथे आला. त्याने कर्मचाºयांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांच्याशी त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना हा प्रकार कळताच तेही तेथे पोहोचले. त्यांनी पोवार याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आणि त्याच्यासोबत असलेली महिला तसेच भरत राजाराम बेबीतकट्टी हे काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी बाबर यांच्याशी वाद घालून त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘सरकारी कामात अडथळा आणू नका,’ असे सांगत असताना तिघेजण बाबर यांच्या अंगावर धावून गेले.
त्या महिलेने बाबर यांचे हात पकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. बिंदू चौकातील वातावरण तणावपूर्ण बनले. परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यावेळी पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले. त्यानंतर अजित पोवार याचे समर्थकही पोलीस ठाण्यात आले. त्यांनी बाबर आणि जुना राजवाडा पोलिसांना गुन्हा मागे घेण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांत फिर्याद देण्याची भूमिका पालिका अधिकाºयांनी घेतली.
दोघांना अटकअश्लील भाषेत शिवीगाळ करण्यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अजित पांडुरंग पोवार व भरत राजाराम बेबीतकट्टी (दोघे रा. बिंदू चौक) यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला व त्यांना अटक करण्यात आली.