कोल्हापूर : सहकाराचा वटवृक्ष करून सामान्य माणसाच्या जीवनात विकासाची पहाट आणण्याचे काम सहकाराने केले. मात्रए अलीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सहकार मोडीत निघत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्थेच्या शाहूपुरी येथील दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकातील ८ लाख कोटी थकबाकीदारांना मदतीचे धोरण घेतले. मात्र, सहकारी संस्थांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. कोरोनामुळे सगळीकडेच आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीरच्या सभापती आश्विनी धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, भरत रसाळे, रविकुमार पाटील आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारकडून सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न - सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:12 IST
सहकाराचा वटवृक्ष करून सामान्य माणसाच्या जीवनात विकासाची पहाट आणण्याचे काम सहकाराने केले. मात्रए अलीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सहकार मोडीत निघत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
केंद्र सरकारकडून सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न - सतेज पाटील
ठळक मुद्देकेंद्र सरकारकडून सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न - सतेज पाटील