शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शाळकरी मुलीला पळविण्याचा प्रयत्न, संभाजीनगर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:18 PM

कोल्हापूर : संभाजीनगर परिसर येथील आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला बुधवारी (दि. ६) लॉलीपॉपदाखवून पळविण्याचा प्रयत्न फसला. तोंडाला रुमाल बांधून ...

ठळक मुद्देशाळकरी मुलीला पळविण्याचा प्रयत्न, संभाजीनगर परिसरातील घटना :संशय आल्याने मुलीने केली सुटका : सीसीटीव्हीद्वारे संशयिताचा शोध

कोल्हापूर : संभाजीनगर परिसर येथील आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला बुधवारी (दि. ६) लॉलीपॉपदाखवून पळविण्याचा प्रयत्न फसला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञाताचा संशय मुलीला आल्याने तिने घरातून पळ काढला.हा प्रकार मुलीच्या आई-वडिलांना घरमालकांनी रात्री सांगितला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध सुरू केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, की संभाजीनगर नाका येथे एक दाम्पत्य भाड्याने राहते. दोघेही खासगी नोकरी करतात. त्यांची मुलगी एका विद्यालयात दुसरीच्या वर्गात शिक्षण घेते. रोज सकाळी शाळा असल्याने ती मुलगी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात येते. त्यांच्या घरापाठीमागे टेरेस आहे. तेथेच त्यांची खोली आहे.

बुधवारी (दि. ६) नेहमीप्रमाणे ती घरी आली. ती घरी एकटीच होती व घराचे दार उघडे होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टेरेसवरून तोंडाला रुमाल बांधून एक अज्ञात तिच्या घरात पोते घेऊन आला. तिला अज्ञाताने लॉलीपॉप दाखविले.

तिला आई-वडिलांनी कोणाकडून चॉकलेट किंवा इतर कोणतेही साहित्य घ्यावयाचे नाही, असे सांगितल्याने तिचा संशय बळावला. ती घरातून पळत, रडत-रडत घराखाली असलेल्या बेकरीत गेली. तिने बेकरीच्या मालकांना हा प्रकार सांगितला. बेकरीवाल्यांनी हा प्रकार त्या मुलीच्या घरमालकांना सांगून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, नागरिकांनी तिच्या घरात जाऊन पाहिले, तर अज्ञात तेथे नसल्याचे निदर्शनास आले. दुपारपासून ती मुलगी रात्री आठ वाजेपर्यंत घरमालकाच्या घरात बसून होती. या मुलीचे आई-वडील रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी आले, तेव्हा घरमालकांनी हा प्रकार त्यांना सांगितला. रात्र झाल्याने गुरुवारी याची माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला.दरम्यान, गुरुवारी या मुलीचे पालक जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला; त्यामुळे पोलिसांनी संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध सुरूकेला आहे.

संशयिताचे वर्णन...संशयिताने तोंडाला रुमाल बांधला होता. त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ होते, तर त्याने अंगात काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता, असे वर्णन त्या शाळकरी मुलीने सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर