शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
2
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
3
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
4
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
5
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
6
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
8
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Kolhapur: चॉकलेट देण्याचा बहाण्याने मुरगुडमध्ये शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 5:08 PM

मुलींच्या धाडसाचे कौतुक

मुरगूड: मुरगूड शहरानजीकच्या शाहूनगर वसाहतीतून मळे पाणंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणंद मार्गाने शाळेकडे जात असलेल्या दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अज्ञात दोघा व्यक्तींनी प्रयत्न केला. मुलींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर अज्ञातांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थी व पालकांत भीती पसरली आहे. पोलिस अज्ञात व्यक्तींच्या शोधात आहेत.याबाबत अधिक माहिती अशी मुरगूडपासून १ किलोमीटर अंतरावरील शाहूनगर वसाहतीमधून अल्पवयीन दोघी मुली मंगळवारी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास मुरगूड शहरातील एका शाळेला पाणंद रस्त्याने येत होत्या. दरम्यान, काळा ड्रेस व बुरखा परिधान केलेला एक इसम अचानक उसातून बाहेर आला व तो मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करीत जवळ आला. त्याचवेळी त्याने आपल्या अन्य साथीदारांशी कन्नड भाषेतून मोबाइलवर संपर्क साधल्याक्षणी क्षणार्थात तेथे मारुती व्हॅन घेऊन दुसरा अज्ञात इसम आला.या व्हॅनमध्ये एका मुलीला जबरदस्तीने कोंबण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्या मुलीने आरडाओरडा करीत पळ काढला. हर्षदानेही प्रसंगावधान राखत आरडाओरड केली. त्या इसमाला दगड मारत आपली सुटका करून घेण्यात ती यशस्वी झाली. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी तेथून मारुती व्हॅनमधून पळ काढला. घाबरलेल्या हर्षदा व सिद्धीका या दोघी शाळेत न जाता सरळ घराकडे गेल्या व त्यांनी घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.या प्रकाराने मुरगूड परिसरात खळबळ उडाली. पालकांनी यासंबंधी पोलिसांत धाव घेतली व घडल्या प्रकाराची हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाहीत. मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान, या घटनेने शाळकरी मुली व पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा व संबंधितांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे .

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस