कार्यक र्त्यांचाआज मेळावा : भावी राजकीय वाटचालीबद्दल निर्णय होण्याची शक्यताराम मगदूम ल्ल गडहिंग्लजचंदगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनपेक्षितरीत्या उडी घेऊनदेखील तिसऱ्या क्रमांकाची २८ हजार मते घेतलेल्या अप्पी पाटील यांच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या, मंगळवारी महागाव येथे होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या गटाच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.महागावच्या ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केलेल्या अप्पींच्या राजकीय कारकिर्दीला सरपंचपदापासून सुरुवात झाली. दहा वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात उपसभापतिपदाची संधीही त्यांना मिळाली. सध्या ते जिल्हा परिषद सदस्य व गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे निकटचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्व. कुपेकरांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या गोपाळराव पाटील यांना साथ दिली. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत ते पुन्हा कुपेकरांकडे आले.दरम्यान, गडहिंग्लज कारखान्याची निवडणूक त्यांनी जनसुराज्यतर्फे, तर जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीतर्फे लढविली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांच्या विरोधात बंड केल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीतून बडतर्फ करण्यात आले आहे. भविष्यात एखाद्या पक्षातर्फे लढल्यास आमदारकीपर्यंत पोहोचता येते, असा त्यांच्या समर्थकांचा व्होरा आहे. त्यामुळे आता ते कोणत्या पक्षाचा झेंडा खाद्यावर घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.‘जारकीहोळीं’ची ताकदकर्नाटकचे अबकारी मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार रमेश जारकीहोळी, माजी मंत्री व विद्यमान आमदार भालचंद्र जारकीहोळी व उद्योगपती लखन जारकीहोळी या ‘गोकाक’च्या जारकीहोळी बंधंूचा वरदहस्त अप्पींना आहे. मंत्री सतीश व आमदार रमेश हे काँगे्रसमध्ये, तर आमदार भालचंद्र हे भाजपमध्ये असून, आमदार रमेश हे अप्पींचे भाऊजी आहेत. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा राहिलेल्या या जारकीहोळी बंधंूची ताकद अप्पींच्या पाठीशी आहे.
अप्पी पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष !
By admin | Published: October 27, 2014 11:59 PM