शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

एचसीएल कंपनीचे आॅडीट करावे : जयश्री चव्हाण

By admin | Published: June 22, 2017 5:21 PM

कोल्हापूर महानगरपालिकेत घोटाळा होत असल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २२ : महानगरपालिका प्रशासनाने रोकड स्वीकारण्याचे तसेच विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी ठेका दिलेल्या एचसीएल कंपनीचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. संबंधित कंपनीकडून आर्थिक घोटाळा होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. याबाबत त्यांनी एक पुरावाही पत्रकारांना दिला. ठेका दिल्यापासून एचसीएल कंपनीचा गैरकारभार सुरु आहे. कराराप्रमाणे जादा सुविधा द्यायच्या होत्या, त्या त्यांनी दिलेल्या नाहीत. कंपनीच्या कारभारावर महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे घोटाळा घडत असल्याचा दावा जयश्री चव्हाण यांनी केला आहे. राजारामपुरीतील शारदा हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या विजय सदाशिव इंदुलकर व जीवन सदाशिव इंदुलकर यांनी गतवर्षी सन २०१६-१७ सालाचा ६३७९ रुपयांचा घरफाळा दि. ८ आॅगष्ट रोजी एचसीएल कंपनीच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन भरला. मुदतीत पैसे भरले म्हणून २२८ रुपयांची सवलतही देण्यात आली. असे असूनही त्यांना सन २०१७-१८ सालचा १० हजार ९७२ रुपयांचा घरफाळा मागणीची पावती देण्यात आली. त्यावेळी इंदुलकर यांनी चौकशी केली असता तुम्ही गेल्यावर्षी घरफाळा भरला नसल्याचे उत्तर देण्यात आले. पावती असूनही घरफाळा भरला नाही असे उत्तर आल्यानंतर इंदूलकर यांनी नगरसेविका चव्हाण व सचिन चव्हाण यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. चव्हाण यांनी एचसीएल कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता घरफाळा भरल्याची नोंद आढळली तर महापालिकेच्या दफ्तरी तो न भरल्याची नोंद आढळली. जर इंदुलकरांनी घरफाळा भरला असेल तर ती रक्कम त्याच दिवशी किंवा दोन तीन दिवसांनी महापालिकेच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती. ती झालेली नाही. शिवाय नवीन बील देताना व्याजाच्या आकारणीतही चुका झाल्या आहेत. थकबाकीच्या रक्कमेवर ४५०० रुपये व्याज आकारले आहे. त्यामुळे यात घोटाळा घडल्याची शंका चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. अशी अनेक प्रकार घडलेले असू शकतात, त्यामुळे एकूणच या कंपनीचे लेखापरीक्षण करण्याची आवशकता असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी एचसीएलच्या कारभाराची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी वसुल केलेल्या परंतु मनपाकडे न भरलेले पैसे व्याजासह वसुल करावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली.