औरवाड-कवठेगुलंद मार्गावर जुन्या चरी भरावामुळे बुजल्याने रस्त्यांच्या डाव्या बाजूला पाणी साचून राहत आहे. यामुळे ५० एकरपेक्षा जास्त शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, भुईमूग, उसाचे नुकसान होत आहे. तसेच शेतालगत असणाऱ्या घरामध्ये साचलेले पाणी जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजलेली चर पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत जयसिंगपूर शाखा अभियंता बागवान यांनी भेट देऊन चर सुरू करून पाण्याचा निचरा करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य जयवंत मंगसुळे, नारायण गावडे, विजय नंरदे, राजू जंगम, श्रीपाल कोले, विपुल रावण, संदीप गावडे उपस्थित होते.
फोटो - १८०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - औरवाड-कवठेगुलंद मार्गावर चर बुजल्याने शेतामध्ये पाणी साचले आहे. (छाया-रमेश सुतार, बुबनाळ)