सतीश पाटील - शिरोली -गेल्या अडीच वर्षांपासून आॅटोमोबाईल व फौंड्री उद्योगाला मंदीचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटेनासे झाले आहे. कोल्हापूरचा आॅटोमोबाईल व फौंड्री उद्योग महिंद्रा, जॉन डिअर, एस्कॉर्ट, ह्युुंडाई, टाटा मोटर्स यांसारख्या मोठ्या नामवंत कंपन्यांवर अवलंबून आहे; पण याच कंपन्यांच्या आॅर्डर्स आॅक्टोबर महिन्यात दिवाळी असूनही ४० ते ५० टक्क्यांइतक्या होत्या. चालू महिन्यात तर यापेक्षाही कमी आॅर्डरी आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर लहान कारखाने चालूच झालेले नाहीत.पायाभूत सुविधा, रस्ते, यासारखे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प गेल्या तीन-चार वर्षांत बंद पडले आहेत. विद्युत पॉवर प्रकल्प, कोळसा प्रकल्प, मायनिंग रेल्वेची कामे यासारखे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना लागणाऱ्या मशिनरी, गाड्या यांची आवकच घटली आहे. त्यामुळे आॅटोमोबाईल क्षेत्रावर मोठ्या मंदीचे सावट दिसत आहे. राज्यात व केंद्रात कॉँग्रेस सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य धोरणेच वापरली नाहीत. मोठ्या प्रकल्पाबाबत कोणतेच निर्णय घेतले नाहीत. उलट इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कर जादा, महाग वीज, रस्ते नाहीत, अनेक ठिकाणी विमान सेवाही नाही, जमीन उपलब्ध नाही, पाणी महाग यासारख्या अनेक कारणांमुळे हे प्रकल्प परराज्यात गेले.कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. हे सर्व उद्योग मोठ्या फौंड्री उद्योगांवर अवलंबून आहेत. फौंड्री उद्योगालाच कामे कमी आल्याने हे उद्योग अडचणीत सापडले आहेत. अनेक लघुउद्योग बंद अवस्थेत आहेत. मोठ्या कंपन्यांनी ‘सीएनसी, व्हीएमसी, व्हीटीएल, एसपीएम’सारख्या आॅटो मशिनरी घेतल्याने कमी वेळेत जास्त काम होते व लेथ मशीनवर अजूनही वेळ लागतो. त्यामुळे लेथ मशीनवर काम करणारे उद्योजक अडचणीत आले आहेत.केंद्रातील नव्या सरकारने अनेक धोरणे राबविली आहेत. ८० हजार कोटींची तरतूद उद्योगक्षेत्र व बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांत केली आहे. सध्या पाच हजार कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत परिस्थिती सुधारेल, असे उद्योजकांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय कंपन्या परराज्यात गेल्यामहिंद्रा अँड महिंद्रा व टाटा मोटर्स या दोन मोठ्या कंपन्यांवरच कोल्हापूरचा आॅटोमोबाईल व फौंड्री उद्योग अवलंबून आहे; पण या दोन्ही कंपन्यांनी आपले मोठे प्रकल्प परराज्यात हलविले आहेत. महिंद्राने आंध्रमधील झायराबाद येथे प्रकल्प सुरू केला आहे, तर टाटा मोटर्सने उत्तराखंडला प्रकल्प सुरू केला आहे. हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे.आॅटोमोबाईलला मंदी आल्याने चालू वर्षात एकच शिफ्ट औद्योगिक वसाहतीत चालू असल्याचे प्रामुख्याने जाणवत आहे. महिन्याला ६० हजार टन कास्टिंग उत्पादन होत होते. ते २५ ते ३० हजार टनांवर आले आहे. मागणी नसल्याने उत्पादनच थंडावले आहे. त्यामुळे कारखानेही एकच शिफ्टमध्ये चालू आहेत. दुसरी व तिसरी शिफ्ट जवळजवळ बंदच आहे.आंतरराष्ट्रीय अनेक कंपन्यांची मागणी घटली आहे. जून-जुलै महिन्यांत चांगली मागणी होती; पण त्यानंतर मागणी कमी झाली. सध्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तर अतिशय कमी आॅर्डर आली आहे. त्यामुळेच एक शिफ्टमध्ये कारखाने चालू आहेत.- समीर काळे, के अँड के फौंड्रीगेल्या अडीच वर्षांपासून उद्योगांना मंदी आहे. तीन वर्षांत मोठे प्रकल्प बंद पडले. शासनाने चार कोणतेच योग्य निर्णय घेतले नाहीत. आंतरराष्ट्रीय कंपन्या इतर राज्यात गेल्या. यासारख्या कारणांमुळे आॅटोमोबाईल उद्योग मंदीत सापडला आहे.- व्ही. एन. देशपांडे, तज्ज्ञ उद्योजक साऊंड कास्टिंग आंतरराष्ट्रीय अनेक कंपन्यांची मागणी घटली आहे. जून-जुलै महिन्यांत चांगली मागणी होती; पण त्यानंतर मागणी कमी झाली. सध्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तर अतिशय कमी आॅर्डर आली आहे. त्यामुळेच एक शिफ्टमध्ये कारखाने चालू आहेत.- समीर काळे, के अँड के फौंड्रीआॅटोमोबाईल क्षेत्राला मंदी जाणवत आहे. ही मंदी कमी होण्यासाठी अजून सहा महिने तरी लागतील. सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले आहे. केंद्र शासनाने उद्योगांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांत मंदी कमी होईल.- नीरज झंवर, झंवर ग्रुप
आॅटोमोबाईल क्षेत्राचे चक्र मंदावल
By admin | Published: November 04, 2014 12:41 AM