शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

स्वायत्त महाविद्यालयांची अवस्था बडा घर पोकळ वासा, तीन वर्षांपासून 'युजीसी'चे अनुदानच नाही 

By पोपट केशव पवार | Published: May 29, 2024 3:23 PM

कोल्हापूर जिल्ह्यात चार महाविद्यालयांत पारंपरिक अभ्यासक्रम 

पोपट पवार कोल्हापूर : महाविद्यालयांनी स्वायत्त होऊन स्वत:चा अभ्यासक्रम तयार करावा, परीक्षा घ्याव्यात, निकालही त्यांनीच जाहीर करावा, असे मृगजळ दाखवत यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) देशभरातील अनेक महाविद्यालयांना स्वायत्त होण्यास भाग पाडले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून यूजीसीने महाविद्यालयांना २० लाख रुपयांचे अनुदानच दिले नसल्याने या महाविद्यालयांची अवस्था 'बडा घर पोकळ वासा' अशी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित पारंपरिक अभ्यासक्रमाची चार महाविद्यालये स्वायत्त आहेत. मात्र, अनुदानाची एक पै ही मिळाली नसल्याने 'हात दाखवून अवलक्षण करण्याचा' पश्चात्ताप या महाविद्यालयांना होऊ लागला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात विवेकानंद, महावीर, डीआरके कॉमर्स कॉलेज व कमला कॉलेज ही पारंपरिक अभ्यासक्रमाची चार महाविद्यालये स्वायत्त झाली. स्वायत्त महाविद्यालयांना त्यांच्या प्राथमिक सुविधांसाठी प्रत्येक वर्षी १५ ते २० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय यूजीसीने घेतला. त्यानुसार पहिली दोन वर्षे तो देण्यातही आला.

मात्र, २०२० पासून हे अनुदान महाविद्यालयांना मिळालेले नाही. एकतर स्वायत्त झाल्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या सवलती बंद झाल्या. त्यात यूजीसीनेही अनुदान तटवल्याने महाविद्यालये अडचणीत आली आहेत. हे स्वायत्ततेचे मृगजळ कळल्याने स्वायत्त होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांनी 'पुढच्याच ठेच मागचा शहाणा' या प्रमाणे सावध पवित्रा घेतला आहे.

काय आहेत अडचणीस्वायत्ततेमुळे विद्यापीठ स्तरावरील बऱ्याच शैक्षणिक व प्रशासकीय प्रकिया महाविद्यालय स्तरावर पार पाडाव्या लागतात. अभ्यासक्रम बनविणे, परीक्षा घेणे, मूल्यमापन करणे व निकाल लावणे. प्रशासकीय मंडळ, अभ्यास मंडळ, शैक्षणिक परिषद आणि वित्त समिती यांची स्थापना करणे या महाविद्यालयांना बंधनकारक आहे. मात्र, या अंमलबजावणीसाठी लागणारे प्रशिक्षित आणि मुबलक मनुष्यबळ कुठून आणायचे, हा प्रश्न या महाविद्यालयांसमोर आहे.

म्हणे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करास्वायत्त महाविद्यालयांनी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून त्यातून महाविद्यालयांचा भौतिक खर्च भागवावा, असे यूजीसीला वाटते. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. ज्या पायाभूत सुविधांसाठी यूजीसीने अनुदान देण्याचे जाहीर केले होते ते अनुदानच तीन तीन वर्षे मिळत नसेल तर नवे अभ्यासक्रम कसे सुरू करायचे, असा सवाल एका प्राचार्यांनी उपस्थित केला.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर स्वायत्त महाविद्यालयांना ठरलेले अनुदान देणे गरजेचे आहे. केवळ कागद रंगवून हे धोरण राबवता येणार नाही. - डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर