शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

चंदगडमधून ‘एव्हीएच’ अखेर हलविणार

By admin | Published: February 14, 2016 1:06 AM

बेल्लारी येथे स्थलांतर : सेंट्रल एक्साईजकडे मागितली परवानगी

कोल्हापूर : गेली तीन वर्षे चंदगड परिसरातील जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेला ‘एव्हीएच’ प्रकल्प चंदगडमधून हद्दपार होणार आहे. कंपनीने इप्सिलॉन कार्बन प्रा. लि. असे नाव बदलून प्रकल्प मुशिनयक्कनहल्ली, सुलतानपूर रोड, सोंडूर, जिल्हा-बेल्लारी (कर्नाटक) येथे हलविण्यासाठी उपायुक्त, सेंट्रल एक्साईज यांच्याकडे परवानगी मागितल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, चंदगड तालुक्यात तीन वर्षांपूर्वी विनाशकाली एव्हीएच प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पामुळे साऱ्या तालुक्याचे आरोग्य धोक्यात आल्याने या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. एव्हीएचच्या विरोधात जनआंदोलन कृती समितीच्यावतीने रस्त्यापासून न्यायालयापर्यंत अनेक लढाया केल्या. त्यामुळेच गेले अकरा महिने प्रकल्प बंद आहे. दोन महिन्यांपासून प्रकल्पाने हळूहळू गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्यांनी ‘एव्हीएच’चे नामकरण करीत इप्सिलॉन कार्बन प्रा. लि. च्या माध्यमातून प्रकल्प बेल्लारी येथे हलविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने ११ जानेवारीला सेंट्रल एक्साईजकडे केली आहे. पण, दुर्दैवाने गेले चार-पाच दिवस नागपूर येथील बैठकीबाबत एव्हीएच विरोधी कृती समितीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केली जात आहे. सासुरवाशीण असतानाही नंदाताई चंदगडच्या जनतेसाठी तुरुंगात गेल्या. छत्रपती शाहू महाराज असते, तर अशा बहाद्दूर रणरागिणीची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत नंदातार्इंचा भव्य सत्कार करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. यावेळी रामराजे कुपेकर, अनिल साळोखे, उदय जोशी, बी. एन. पाटील-मुगळीकर, आदी उपस्थित होते. कुऱ्हाडीचा दांडा.... चंदगडच्या जनतेच्या एकजुटीमुळे ‘एव्हीएच’ प्रकल्प जाणार हे निश्चित होते; पण काही मंडळींनी जाताजाता नंदातार्इंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची उमेदवारी वहिणींना देण्याचा निर्णय आमच्यासह पवारसाहेबांनी घेतला. अडचणीच्या काळात आईला आधार देण्यासाठी नंदाताई येथे थांबल्या; पण ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ याप्रमाणे काही मंडळी त्रास देत असल्याची टीका मुश्रीफ यांनी संग्राम कुपेकर यांचे नाव न घेता केली. ‘नंदीं’ची चौकशी लावणार ‘एव्हीएच’ने औद्योगिक परवाना घेतलेला नाही. त्याचबरोबर १८० कोटींचा अति प्रदूषणकारी अंतर्गत येणारा उद्योग परवाना घेतला नसताना प्रकल्प चालूच झाला कसा? याबाबत तत्कालीन प्रदूषण मंडळाचे अधिकारी तपस नंदी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. चंदगडमधील लहान मुलांसह वयोवृद्धांनी आंदोलनात सहभाग घेतला. आपल्या आमदारकीच्या काळात हा प्रकल्प उभा राहिल्याने तो घालविणे हे माझे कर्तव्य होते. नंदाताई बाभूळकरांनी सातत्याने पाठपुरावा करीत न्यायालयीन लढाई दिली. आजच्या विजयावर राष्ट्रवादी कॉँग्रेस कधीच दावा करणार नाही. सर्वपक्षीय लोकांनी विशेषत: चंदगड, गडहिंग्लजची जनता पाठीशी राहिल्यानेच यश आले. शिवसेनेने परवा मेळावा घेऊन श्रेयवादाबाबत काही मुद्दे उपस्थित केले; पण तालुक्यातून विष घालविण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. - संध्यादेवी कुपेकर, आमदार  

एव्हीएच प्रकल्पाने आपला बाडबिस्तारा गुंडाळला आहे. हा चंदगडच्या जनतेचा विजय असून, पर्यावरणविरोधात काम करणाऱ्या ‘एव्हीएच’ला येथील लढाऊ जनतेने दिलेला हा तडाखा आहे. हा प्रकल्प जिल्ह्णातून हद्दपार व्हावा यासाठी केंद्र व राज्यस्तरावर मी पाठपुरावा केला. ‘एव्हीएच’विरोधी आंदोलनात नेहमीच चंदगडच्या जनतेबरोबर होतो. - धनंजय महाडिक, खासदार, कोल्हापूर