राजाराम पाटील - इचलकरंजी --मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर विरुद्ध काँग्रेसचे प्रकाश आवाडे हे आमने-सामने आहेत. राष्ट्रवादीचे मदन कारंडे व शिवसेनेचे मुरलीधर जाधव हे देखील रिंगणात आहेत. इचलकरंजीत कॉँग्रेस व भाजप यांच्या दरम्यान दुरंगी लढत होण्याची चिन्हे असतानाच युती फुटली आणि आघाडी तुटल्याने आता बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा चारही पक्षांबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.सन २००९ मधील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना पराभूत करून सुरेश हाळवणकर निवडून आले. त्यानंतर सन २०११ मधील डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हाळवणकर यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील काही गट आपल्याकडे वळवून, तसेच शिवसेना, भाजपला एकत्रित करीत शहर विकास आघाडीच्यावतीने पालिकेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत ‘शविआ’ने १७ नगरसेवक निवडून आणले.त्यानंतर हाळवणकर यांनी भाजपचा विस्तार ग्रामीण परिसरातही केला. जिल्हा परिषद व तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये कबनूर व कोरोची या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ‘शविआ’ व भाजपचे उमेदवार निवडून आणले, तर तीन उमेदवार ‘शविआ’ चे निवडले गेले. तालुका पंचायतीच्या चारपैकी फक्त तारदाळ तालुका पंचायत मतदारसंघात राष्ट्रीय कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला.यावेळी राष्ट्रवादीनेही पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. त्यांचे दहा नगरसेवक व कॉँग्रेसचे ३० नगरसेवक निवडले गेले. दोन्ही कॉँग्रेसने आघाडी केली आणि गेले पावणेतीन वर्षे पालिकेचा कारभार पाहत आहेत. अशा स्थितीत प्रदेश पातळीवर युती व आघाडी तुटली. आणि स्थानिक पातळीवरील आघाड्यांची समीकरणेच बदलली. अगदी अंतिम टप्प्यावर आघाडी ‘बिघडल्याने’ चारही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आणि धावपळ झाली.सद्य:स्थितीला पालिकेत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ आणि शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. ‘शविआ’मध्ये शिवसेना तीन, भाजप चार, राष्ट्रवादी पाच आणि कॉँग्रेसचे सहा नगरसेवक असून, पक्षनिहाय एकूण स्थिती पाहता अनुक्रमे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना अशी स्थिती आहे, तर इचलकरंजी शहर वगळता चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ व खोतवाडी या पाच गावांचा समावेश आहे. यापैकी चंदूर, कबनूर व कोरोची या ग्रामपंचायती कॉँग्रेसच्या, तर तारदाळ व खोतवाडी ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या सत्तेखाली आहेत. तारदाळ, खोतवाडी व शहापूर येथे राष्ट्रवादीचे कारंडे यांनी तीन वर्षांपासून संपर्क ठेवत काही विकासकामे केली आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला आहे. तसेच पालिका निवडणुकीतसुद्धा त्यांना मानणारे सात नगरसेवक आहेत. ‘शविआ’मध्ये शिवसेनेचे तीन, तर भाजपचे चार नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आता ‘शविआ’चे ध्रुवीकरण होणार, अशी चर्चा आहे. ‘शविआ’तील उरलेल्या राष्ट्रवादीच्या पाच व कॉँग्रेसच्या सहा नगरसेवकांमध्ये सुद्धा फूट पडू लागली आहे. त्यामुळे एकूणच मतदारसंघात राष्ट्रीय कॉँग्रेस पाठोपाठ भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांचे पारडे तौलनिकदृष्ट्या बरोबरीचे मानले जात आहे. इचलकरंजी एकूण मतदार २,६८,४६0नावपक्षसुरेश हाळवणकरभाजपप्रकाश आवाडेकाँग्रेसमदन कारंडे राष्ट्रवादीमुरलीधर जाधव शिवसेनासदाशिव मलाबादेमाकपमिश्रीलाल जाजू जय जनसेवा पार्टीर् बसवलिंग स्वामीजी बहुजन मुक्ती पार्टीबालमुकुंद व्हनुंगरेअपक्षसीताराम शिंदेबसपामोहन मालवणकरमनसेदिलावर म्हालदारअपक्षराहुल पाटीलअपक्ष
आवाडे-हाळवणकर आमने-सामने
By admin | Published: October 01, 2014 10:36 PM