फोटो (०७०३२०२१-कोल-महिला दिन ०८) : महिलांचा दिवस उगवतो तो कष्टाने आणि मावळतोही कष्टानेच. रोजंदारीवर काम करायला निघणाऱ्या या महिला दिवसभर काम आटोपून मावळतीच्या सूर्याची किरणे झेलत घराची वाट तुडवत असताना उचगाव रेल्वेफाटकावरून निघालेल्या या महिला पाहिल्या की यांना कधी तरी विसावा मिळेल की नाही असे क्षणभर वाटून जाते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०७०३२०२१-कोल-महिला दिन ०९ ते १३) : कोणतेही वाहन असो, आज महिला त्या सफाईदारपणे चालवितात. मग शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा ट्रॅक्टर तरी कसा मागे राहील. साबळेवाडी (ता. करवीर) येथील रत्नमाला संजय पाटील असा ट्रॅक्टर घेऊन शेताची मशागत करतात. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०७०३२०२१-कोल-महिला दिन ०६ व ०७) : कामे आटोपली की सख्यासोबतचा असा निवांतपणा पुन्हा एकदा नव्या दिवसाला नव्या दमाने सामोरे जाण्याची ऊर्मी येते. सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील डोंगर टेकड्यावर असाच निवांतपणा अनुभवणाऱ्या या महिलांना कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही. (छाया : नसीर अत्तार)