पेठवडगाव : येथील बळवंतराव यादव हायस्कूलचे लिपिक व शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यवाहक अभिजीत गायकवाड यांना ‘आदर्श लिपिक पुरस्कार’ शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. कोल्हापूर येथील न्यू काॅलेज येथे शिक्षणतज्ज्ञ स्व. डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंचतर्फे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील-वडगावकर, बी. जी. बोराडे, दादासाहेब लाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार यांनी केले.
या पुरस्कारासाठी अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, सचिव विद्या पोळ यांचे प्रोत्साहन मिळाले. अभिजीत गायकवाड यांची २४ वर्ष सेवा झाली असून, ते बळवंतराव यादव हायस्कूलसह परिसरातील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
फोटो ओळ : कोल्हापूर येथील न्यू काॅलेज येथे शिक्षणतज्ज्ञ स्व. डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंचतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अभिजीत गायकवाड यांना गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.