रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे अवाॅर्डचे स्वरूप आहे. महाविद्यालयाने सलग ३३ वर्षे मलखांब क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वैयक्तिक आणि सांघिक खेळांमध्येही राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रावीण्य दाखविले आहे. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डाॅ. वासंती रासम, प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर यांनी विजेत्यांचा सत्कार केला.
कलर्स अवार्ड प्राप्त खेळाडू प्रकार-
सुशांत पाटील, कुणाल दरवान, केतन चिंचणे, सुहास कंदुरकर( सर्व मल्लखांब), अक्षय पाटील (रग्बी), तर क्रीडा संचालक प्रा. आण्णासाहेब पाटील यांना मल्लखांबचे टीम मॅनेजर कम कोच म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
.............................................
फोटो ओळी- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील कलर्स अवाॅर्ड खेळाडूंचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला. प्रशासकीय अधिकारी डाॅ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, क्रीडा संचालक आण्णासो पाटील उपस्थित होेते.
...