यड्राव : जय
यड्राव : जयसिंगपूर येथील उद्योजक शंकर मारुती कुंभार यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम ऑफ टोंगा यांच्याकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी देण्यात आली. गोवा येथे झालेल्या पदवीदान समारंभात उपकुलगुरू डॉ. रिपूरंजन सिन्हा व इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे विश्वस्त डॉ. आनंदेश्वर पांडे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. कुंभार यांनी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उद्योग निर्मितीमधून बेरोजगारांना रोजगार निर्मिती करून दिली. या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपूर्वक डॉक्टरेट प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी आर. डी. काळगे, अनिल खिलारे, शीतल देमाणा, मुकुंद कुंभार, राजाराम सुतार, देवाप्पा गावडे, बिरू वाळकुंजे, संपत कोळी, बंडू राऊत, घन:शाम कुंभार, प्रणितकुमार उपस्थित होते.
फोटो - ०२०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळी - गोवा येथे उद्योजक शंकर कुंभार यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी उपकुलगुरू रिपूरंजन सिन्हा व डॉ. आनंदेश्वर पांडे उपस्थित होते.