कोल्हापूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, ऊर्जेचा, आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव. लोकमत ‘सखी मंच’च्या सदस्यांचा या सणाचा आनंद द्विगुणित करीत झालेल्या ‘सखी महोत्सवा’त दिवाळीनिमित्त सखींनी बक्षिसांची लयलूट केली.सखींमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी लोकमत ‘सखी मंच आणि गोपीनाथ अनंत चिपडे सराफ अॅन्ड सन्स’ यांच्यावतीने आयोजित ‘सखी महोत्सवा’चे उद्घाटन संजीवनी चिपडे, तन्वी चिपडे, उषा चिपडे, अनुराधा पित्रे यांच्या हस्ते झाले. दिवसभर चाललेल्या या महोत्सवांतर्गत मेहंदी, रांगोळी, रेसिपी, फॅन्सी ड्रेस व ब्रायडल मेकअप अशा विविध स्पर्धा झाल्या. चिपडे सराफ यांच्या नागाळा पार्क येथील दालनात सकाळी ११ वाजल्यापासून या महोत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या सखी सदस्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात तरुणींची संख्या लक्षणीय होती. कुणी विविध रंगांनी सुरेख रांगोळीचा गालिचा रेखाटत होते. दुसरीकडे हातावर मेहंदी रंगत होती. काही महिलांनी नववधू वेशभूषा स्पर्धेत नखशिखांत सजून सौंदर्याची छाप उमटविली, तर सुरगण असलेल्या सखींनी आपल्या पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण पाककृतींची सुरेख मांडणी करीत होत्या. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच उपस्थित सखींना ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या. परीक्षक म्हणून अनुराधा पित्रे, वृषाली शिंदे व इक्रा मणेर यांनी काम पाहिले. शुभलक्ष्मी देसाई, स्मिता ओतारी यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)‘चिपडे’मध्ये आकर्षक दागिने शंभर वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात नावीन्यपूर्ण आणि कलाकुसरीच्या दागिन्यांची विश्वसनीय पेढी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपडे सराफ यांचे नवे दालन नागाळा पार्क येथे सुरू झाले आहे.दालनात अँटिक ज्वेलरी, फॉर्मिंग ज्वेलरी, चांदीचे दागिने असे सखींना आवडणारे दागिने उपलब्ध आहेत. पेढीतर्फे सखी सदस्यांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. ‘चिपडे’मध्ये आकर्षक दागिने शंभर वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात नावीन्यपूर्ण आणि कलाकुसरीच्या दागिन्यांची विश्वसनीय पेढी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपडे सराफ यांचे नवे दालन नागाळा पार्क येथे सुरू झाले आहे.दालनात अँटिक ज्वेलरी, फॉर्मिंग ज्वेलरी, चांदीचे दागिने असे सखींना आवडणारे दागिने उपलब्ध आहेत. पेढीतर्फे सखी सदस्यांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे.
सखी महोत्सवात बक्षिसांची लयलूट
By admin | Published: November 06, 2015 12:31 AM