शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

corona virus-गाण्याच्या माध्यमातून शिक्षकाची ‘कोरोना’साठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 2:32 PM

कोल्हापूरातील विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कोरे यांनी स्वत: गाणे लिहून त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.

ठळक मुद्देगाण्याच्या माध्यमातून शिक्षकाची ‘कोरोना’साठी जनजागृतीराजेंद्र कोरे यांचा अभिनव उपक्रम : सोशल मिडियावर गाण्याची चर्चा

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोल्हापूरातील विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कोरे यांनी स्वत: गाणे लिहून त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.राजेंद्र कोरे हे विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक आहेत. त्यांना गाण्याची आवड आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी स्वत: हे गाणे तयार करून ते लोकप्रिय गाण्याच्या चालीवर गायिलेही आहे.

https://youtu.be/Iyum3sefH9A

युट्यूबवर त्यांनी कोरोनाबाबत जागृती करण्याबाबतचा व्हिडिओ प्रसारित केला असून सोशल मिडियावर बराच व्हायरल होतो आहे. कोरोना आजाराला घाबरून न जाता नेमक्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबद्दल सहज-सोप्या शब्दांचा वापर करून रचलेल्या या गाण्याच्या माध्यमातून कोरे यांनी कोरोना हे गाणे तयार केले आहे. यातून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी आणि उपाय योजना सुचविल्या आहेत.राजेंद्र कोरे यांनी यापूर्वीही महापुराचा आपत्तीदरम्यान प्रत्यक्ष मदत कार्य करण्याबरोबरच नागरिकांनी महापुरामध्ये घ्यावयाची काळजीबाबत ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून प्रसार केला होता. सध्या त्यांचे हे गाणे फेसबुक, युट्यूब आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झालेले आहे. लोकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहेत.एवढी काळजी तुम्ही घ्या...कराओके ट्रॅकवरील संगीताचा वापर करून त्यांनी ‘नको गर्दीत जाऊ, थोडासा प्रवास टाळू, खोकताना, शिंकताना नाकावर रुमाल ठेवू, येवढी काळजी तुम्ही घ्या, कराना कराना हे करा ना, पळवून लावू हा कोरोना’हे गीत शब्दबद्ध करून लयीत रेकॉर्ड केले आहे.

सध्या शाळा- कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे मुले सोशल मिडियावर जास्त अ‍ॅक्टीव्ह आहेत. त्यांच्यापर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे.- राजेंद्र कोरे, शिक्षक, न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालय, विक्रमनगर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरmusicसंगीत