शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

अहो, ए.वाय तुमचा शत्रू कोण हे आधी ठरवा, माजी आमदार दिनकरराव जाधवांचा सबुरीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 7:24 PM

ए.वाय पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत

दता लोकरेसरवडे : अहो, ए.वाय. पाटील तुम्ही आणि के.पी. पाटील एकमेकांशी भांडत बसला आहात पण तुमच्या दोघांचाही खरा शत्रू कोण..?  हे आधी ठरवा आणि मगच राजकीय वितंडवाद करा असा सल्ला माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी बुधवारी या दोन नेत्यांना दिला..दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या पाहुण्यांचा वाद विकोपाला गेला आहे. याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे असे असताना जाधव यांनी फोन करून या दोघांना सबुरीचा सल्ला दिला.सहकारातील अभ्यासू, संयमी नेतृत्व म्हणून बिद्री साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांची कारखाना कार्यक्षेत्रात व जिल्ह्यात ओळख आहे. वयोमानानुसार सध्या ते तिरवडे गावीच  विश्रांती घेत असतात. मात्र गेले काही दिवस के. पी व ए. वाय यांच्या राजकीय संघर्ष त्यांच्या कानावर पडत आहे याची चर्चाही वाड्यात सुरू असते या पार्श्वभूमीवर  पाडव्या दिवशी त्यांनी के .पी पाटील व ए.वाय पाटील यांना फोन करत सबुरीचा  सल्ला देत त्यांना फटकारले.जाधव म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी आमचे तात्विक वाद आहेत म्हणून आम्ही तुमच्याशी अलीकडे जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ निवडणुकीत साथ केली. मात्र काही निवडणुका तोंडावर येत असताना दोघातील वाद कशासाठी, कुणासाठी हे ठरवा आणि शत्रू कोण हे ओळखा अन्यथा आम्हाला सुध्दा विचार करावा लागेल. के. पी. ना सुद्धा जिल्हा बँकेत संचालक करताना अनेकांनी विरोध केला. मात्र काही वेळा संस्थेचे हित, नवे नेतृत्व घडवताना जेष्ठांचा सल्ला पुढे उपयोगी असतो याची त्यांनी आठवण करून दिली.राधानगरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याला उमेदवारी मिळावी अन्यथा वेगळा विचार करू अशी उघड भूमिका दोनच दिवसांपूर्वी जाहीर मेळावा घेऊन स्पष्ट केली आहे. परंतू के.पी.पाटील या उमेदवारीवरील हक्क सोडायला तयार नाहीत..त्यातून पक्षातील या दोन नेत्यांत निवडणूकीच्या आधीच घमशान सुरू झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडगाव येथील कार्यक्रमात कोण गाडीत बसले आहे आणि नाही याचा विचार न करता विधानसभेची तयारी करा असा सल्ला के.पी.पाटील यांना दिल्याने त्यांचे मेव्हणे असलेले ए. वाय.पाटील संतप्त झाले आहेत..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस