हकीकत अशी : शहरातील ताशिलदार गल्लीत दीपक शंकर सुतार (वय ५०) यांचा पत्नी व आकाश (२२) आणि अभिमन्यू (१९) या दोन मुलांसह गुण्या-गोविंदाने जीवनप्रवास सुरू होता. बुधवारी (२१) सायंकाळी दीपक यांना छातीत दुखू लागल्याने शेजारील नागरिकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी कुटुंबीयांच्या कानावर पडली. वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांपाठोपाठ सर्वांत मोठा असणारा आकाश (वय २२) या कर्त्या मुलाचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
पतीचा मृतदेह रुग्णालयात तर कर्त्या मुलाचा घरात हृदयविकाराने झालेल्या मृत्यूने पत्नी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा व संकेश्वरकरांना सुन्न करून सोडला.
गेल्या ५ वर्षांपासून आकाशला हृदयविकाराचा त्रास सुरू होता तरीही वडिलांनी त्याची विशेष काळजी घेतली होती. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला आणि हृदयविकाराचा त्रास असूनही आकाश घराची रंगकामे करून वडिलांना हातभार लावत होता.
पती व कर्त्या मुलाच्या दुर्दैवी जाण्याने अबोल झालेली आकाशची आई, त्याचा लहान भाऊ अभिमन्यू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
--------------------------
* आकाश सुतार : २२०४२०२१-गड-०८