मंगळवार पेठेचा काही भाग असणाऱ्या ‘मंगेशकरनगर’ प्रभागात रस्ते, पाणी, वीज या प्राथमिक सुविधा समाधानकारक आहेत. याशिवाय प्रदूषणमुक्तीसाठी दरवर्षी ५० दुर्मीळ झाडांचे जतन करणारा प्रभाग म्हणून आदर्श प्रभाग ठरला आहे. आपल्या प्रभागात सतत संपर्क ठेवून सकाळपासून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर काम करणारा नगरसेवक म्हणून संभाजी जाधव यांची ख्याती आहे. तरीही येथील महालक्ष्मीनगरात ड्रेनेजलाईनचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रभागातील बच्चन बागेची दुरवस्था नागरिकांच्या नजरेला वेदना देणारी आहे.मंगेशकरनगरात पाटाकडील तालीम मंडळ परिसर, साठमारी, मंडलिक गल्ली, बेलबाग, राधाकृष्ण मंडळ, प्रॅक्टिस क्लबचा परिसर, भक्तिपूजा नगर, जयप्रभा स्टुडिओ, सरनाईक वसाहत, महालक्ष्मी नगर, तुकाराम माळी तालीम मंडळ, आदी भागांचा समावेश होतो. या प्रभागात सर्वसामान्य ते उच्चभू्र असे लोक राहतात; तर फुटबॉल खेळाशी इथल्या बहुतांश नागरिकांची नाळ जोडली गेली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात तरुण मंडळे आहेत. प्रभागाची लोकसंख्या सात हजारांच्या आसपास आहे. प्रभागात टिकण्यासाठी नगरसेवकांना सातत्याने काम करणे अपरिहार्य आहे. या प्रभागात पाणी, ड्रेनेजलाईन, रस्ते या प्रमुख मागण्यांबरोबर अंतर्गत रस्ते आणि पदपथ उद्यानाची गरज आहे. याशिवाय दोन एकरांपेक्षा अधिक विस्तीर्ण असणाऱ्या बेलबागेतील बच्चन बागेची दुरवस्था झाली आहे. या बागेमध्ये केवळ लहान मुलांच्या खेळण्यांचे सांगाडे उरले आहेत; बागेचे गेट २४ तास खुले असते. त्यामुळे हा परिसर म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. ही बाग रात्रीच्यावेळी मद्यपींसाठी ‘ओपन बार’ म्हणून या परिसरात प्रसिद्ध आहे. या प्रभागातील महालक्ष्मीनगर येथे ‘आयआरबी’ने ड्रेनेजलाईनसाठी खुदाई केली होती. मात्र, ड्रेनेजलाईन न टाकताच हा रस्ता मुजविला गेला. यावरच महापालिकेने डांबरीकरण केले आहे. त्यामुळे भविष्यात या भागात ड्रेनेजची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रभागात गेल्या चार वर्षांत पाणीटंचाई आहे म्हणून एकदाही टँकर मागविण्यात आलेला नाही. शिवराज विद्यालयामध्ये पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले असून, सध्या या शाळेची पटसंख्या १२४ इतकी आहे. प्रभागात दुर्मीळ झाडांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाने विशेष प्रयत्नही नगरसेवक जाधव करीत आहेत. प्रभागातील ९० टक्के काम पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला आहे.प्रभागातील समस्या...मंगेशकरनगर येथील कामगार भवन ते भोसले हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. तो डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. महालक्ष्मीनगर येथील ड्रेनेजलाईनचे अपूर्ण काम बेलबागेतील बच्चन बागेची दुरवस्था. परिसरात रात्रीच्यावेळीदारूड्यांचा धुडगूसविकासकामांचा दावा...महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, मंडलिक वसाहत, आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांसाठी सहा कोटींचा निधी वापरला.महालक्ष्मीनगर येथील पुलाचे काम व रेटनिग वॉलचे तीन कोटींचे काम पूर्ण केले.माळी चेंबर्स, बराले पॅसेज येथील सडलेली ड्रेनेजलाईन बदलली.ांडलिक वसाहत येथील ड्रेनेजलाईनच्या कामास सुरुवात.मंगेशकरनगर येथील बागेत वॉकिंग ट्रॅक अद्ययावत केला. बेलबाग ते रेणुका चौक हा रस्ता केला.पद्मावती, माळी चेंबर्स, महालक्ष्मीनगर, मंडलिक वसाहत येथील जुनी पाईपलाईन बदलून दोन इंचीऐवजी सहा इंची पाईपलाईन टाकली. प्रतिबिंब प्रभागाचेसचिन भासले
आदर्श प्रभागाला बच्चन बागेचा ‘डाग’
By admin | Published: December 25, 2014 11:29 PM