कोल्हापूर : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दोन दिवस संप पुकारल्याने शाळेत ने- आण करण्यामध्ये पालकांची मोठी तारबंळ उडली होती. मात्र, सोमवारपासून रिक्षा चालकांनी संप मागे घेतल्याने अखेर पालकांची घालमेल थांबली आणि पुन्हा एकदा शाळेच्या आवारात रिक्षाचे हॉर्न वाजू लागले.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थी वाहतूक करणार्या रिक्षा चालकांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या निषेधार्थ शुक्रवार व शनिवारी दोन दिवस रिक्षा चालकांनी संप पुकराला होता. हा संप सोमवार पासून मागे घेण्यात आला.