कोल्हापूर : राज्य शासनाने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील पदोन्नतीत मागासवर्गीयांचे ३३ टक्के आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात राज्य शासनाने पदोन्नतीत मागासवर्गीयांचे पूर्वीचे आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गातून पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे, जो घटनाबाह्य आहे. न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना असा निर्णय घेणे चुकीचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण रद्द करून महाराष्ट्रात घातला गेलेला गोंधळ थांबवावा, गरीब कष्टकरी नागरिकांना जीवनावश्यक साहित्य पुरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, राज्य सचिव मंगलराव माळगे, बी. के. कांबळे, रूपा वायदंडे, दत्ता मिसाळ, राजेंद्र ठिकपुर्लीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
फोटो नं ०१०६२०२१-कोल-आरपीआय निदर्शने
ओळ : मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करू नये या मागणीसाठी मंगळवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
---