शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

कोल्हापुरातील सीपीआरच्या शवागृहाची दुरुस्ती होईना, नव्याला मुहूर्त मिळेना; मृतदेहांची हेळसांड 

By उद्धव गोडसे | Published: November 29, 2024 5:30 PM

प्रचंड दुर्गंधी, मृतदेहांची हेळसांड; डॉक्टर, कर्मचारी हैराण

उद्धव गोडसेकोल्हापूर : सीपीआरमधील शवागृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वारंवार बिघडणारी वातानुकूलित यंत्रणा, उडालेला रंग, जीर्ण झालेल्या भिंती आणि अस्वच्छतेमुळे या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, कर्मचारी हैराण झाले आहेत. सीपीआर प्रशासनाने विनंती करूनही या शवागृहाची दुरुस्ती होत नाही, तर शेंडा पार्क येथे तयार असलेले शवागृह सुरू करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून मुहूर्त मिळेना. यामुळे मृतदेहांची हेळसांड होत आहे.

दक्षिण महाराष्ट्रासह कोकण आणि कर्नाटकातून कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांची उत्तरीय तपासणी करावी लागते. काही मृतदेह शवागारात ठेवावे लागतात. मात्र, यासाठी शवागारात पुरेशी व्यवस्था नाही. केवळ दोन बेडची व्यवस्था असल्याने अनेकदा एकमेकांना खेटून मृतदेह ठेवावे लागतात.यातच वातानुकूलित यंत्रणा बिघडत असल्याने त्याचा मृतदेहांवर परिणाम होतो. मृतदेहांची दुर्गंधी वाढते. याच स्थितीत इतर मृतदेहांवरील उत्तरीय तपासणीचे काम डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करावे लागते. याची तात्पुरती दुरुस्ती व्हावी यासाठी सीपीआर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, शेंडा पार्क येथे नवीन शवागार तयार असल्याने सीपीआरमधील शवागाराची दुरुस्ती होत नाही. दुरवस्था झालेल्या शवागारातच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. तातडीने या शवागाराची दुरुस्ती व्हावी आणि शेंडा पार्कातील शवागार सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शेंडा पार्कात २४ बेडचे शवागारशेंडा पार्क येथे २४ बेडचे अद्ययावत शवागार तयार केले आहे. दीड वर्षापूर्वीच ही इमारत तयार झाली असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही सुरू झाला आहे. शवागृह सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालयासह अन्य शासकीय यंत्रणांची परवानगी आवश्यक असते. यासाठी सीपीआरकडून पत्रव्यवहार झाले आहेत. नवीन शवागृह तातडीने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागणार आहे.अस्वच्छता, दुर्गंधीशवागाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच सांडपाणी आणि चिखलाचे साम्राज्य असते. शवागारातील स्थिती त्याहून भयानक आहे. कोपऱ्यांमध्ये वैद्यकीय कचरा उघड्यावर पडलेला असतो. कचऱ्याने भरलेल्या पिशव्यांचा ढीग दोन-तीन दिवस पडून असतो. साहित्य विस्कटलेले असते. अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

नातेवाइकांनी थांबायचे कुठे?मृतांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी शवागृहाबाहेर पत्र्याचे शेड आहे. या शेडचे पत्रे खराब झाले आहेत. पावसाळ्यात इथे थांबणेही शक्य होत नाही. बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. बहुतांशवेळा भटक्या कुत्र्यांचा इथे मुक्काम असतो. चिखल आणि दलदलीमुळे डासांचा त्रास वाढल्याने मृतांचे नातेवाईक आणि कर्मचारी हैराण झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय