शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

नवरात्रीतील सुरक्षेसाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या तीन दारात बॅग स्कॅनर, गुरुवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 1:04 PM

२० स्क्रीनद्वारे थेट दर्शन

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने सुरक्षेची खबरदारी घेतली जात असून त्यासाठी मंदिराच्या तीनही दरवाजांबाहेर बॅग स्कॅनर बसविण्यात येत आहेत. तर गुरुवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता होणार आहे.गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता असलेल्या अंबाबाई मंदिराच्या नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक कोल्हापूरला येतात. यंदा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने नवरात्रोत्सवाचे नियोजन केले जात असून त्याची सुरुवात मंदिर परिसर स्वच्छतेने होणार आहे. मुंबईतील आय स्मार्ट फॉसिटिक कंपनीमार्फत गुरुवारपासून स्वच्छतेला प्रारंभ होणार आहे.उत्सव काळात मंदिर व बाह्य परिसरातील सुरक्षा वाढवण्यात येत असून पूर्व, दक्षिण व उत्तर दरवाजावर बॅक स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. हे स्कॅनर समितीकडे आले असून पुढील दोन चार दिवसांत ते कार्यरत केले जातील. माजी खासदार संभाजीराजे यांच्या निधीतून साऊंड सिस्टीम बसविण्यात आली आहे. गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या पूर्व दरवाजाबाहेर स्टीलचे बॅरिकेटस बसविण्यात येत आहेत.२० स्क्रीनद्वारे थेट दर्शनज्या भाविकांना गाभाऱ्यापर्यंत जाऊन अंबाबाईचे दर्शन घेणे शक्य नाही किंवा रांगेत असलेल्या भाविकांना देवीची पूजा, गाभाऱ्यातील विधी दिसावेत यासाठी मंदिर व बाह्य परिसरात २० स्क्रीन बसविण्यात येत आहेत. तीन मोठे एलईडी स्क्रीन मंदिराच्या दरवाजाबाहेर व अन्य स्क्रीन मंदिर आवारात असतील. बिंदू चौकासह शहरात ठिकठिकाणी स्क्रीन बसविले जाणार आहेत.इमारतीची स्वच्छता व वायरिंगशेतकरी संघाच्या इमारतीतून दर्शन रांग वळविण्यात येणार असून सध्या या इमारतीच्या दोन्ही मजल्यांची स्वच्छता व वायरिंगचे काम सुरू आहे. कित्येक वर्षे इमारत बंद असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात धूळ आहे, रांगाच्या दृष्टीने देवस्थान समितीला अन्य सोयीसुविधा कराव्या लागणार असल्याने त्यादृष्टीने इमारतीची अंतर्गत कामे केली जात आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर