बगॅसला उच्च तापमानामुळे सोमवारी रात्री नऊच्यादरम्यान आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याविषयी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मणेर मळ्यात माजी जि. प. सदस्य यांची जागा आहे. ही जागा त्यांनी बगॅससाठी भाड्याने दिली आहे. या ठिकाणी बगॅसला आग लागल्यानंतर दीड तासानंतर आग आटोक्यात आली. या आगीचा धूर लांबून दिसत होता. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. अग्निशमन पथकाने आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.
यामध्ये अंदाजे ५ ते ७ लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, बगॅसच्या मालकाविषयी माहिती मिळू शकली नाही.
०५ मणेर मळा
फोटो ओळ : उचगाव (ता. करवीर) येथील बगॅसला लागलेली आग.