शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Kolhapur- विशाळगड तोडफोड: फोटोत दिसणाऱ्या ७ जणांचा जामीन फेटाळला, १७ संशयितांचा जामीन मंजूर

By उद्धव गोडसे | Published: August 06, 2024 4:10 PM

सात संशयित उच्च न्यायालयात दाद मागणार

कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीत फोटोंमध्ये दिसणाऱ्या सात जणांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश (४) ए. पी. गोंधळेकर यांनी आज, मंगळवारी (दि. ६) फेटाळला. उर्वरित १७ संशयितांचा जामीन मंजूर झाला. १५ जुलैपासून सर्व संशयित अटकेत आहेत. जामीन मंजूर न झालेले सात जण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.चेतन आनंदराव जाधव (वय ३०), ओंकार दादा साबळे (२१), सूरज माणिक पाटील (२९), आदित्य अविनाश उलपे (२९), ओंकार तुकाराम चौगुले (२१, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर), ओंकार सुनीलसिंह राजपूत (२९, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सिद्धार्थ धोंडिबा कटकधोंड (३०, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) अशी जामीन नामंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत.सुशांत आत्माराम सरदेसाई (२८, रा. कणेरीवाडी, ता. करवीर), गोपी कुंडलिक सूर्यवंशी (३०), महेश आनंदा पाटील(२२), सचिन विठ्ठल संकपाळ (४२, तिघे रा. गोकुळ शिरगाव), प्रेम पंडित पाटील (२१) रोहन पांडुरंग पाटील (२५), दीपक तानाजी सोळवंडे (२६), सुशांत दिनकर उलपे (२६, चौघे रा. कसबा बावडा), नितीन बाबूराव वर्पे (५१), प्रकाश गणपतराव मोरबाळे (४७), मधुकर बब्रूवान गुरव (४५), मधुसुदन प्रताप भोई (३५), योगेश चांगदेव पाटील (४३, सर्व रा. इचलकरंजी), संतोष आप्पासाहेब साठे (३०), मयूर विजय दीक्षित (२८, दोघे रा. धनकवडी, पुणे) आणि ईश्वर राजकुमार कट्टे (२४, रा. कात्रज, पुणे) यांना जामीन मंजूर झाला.संशयितांच्या वतीने ॲड. सागर शिंदे, ॲड. अभिजीत देसाई. ॲड. धनंजय चव्हाण, ॲड. केदार मुनीश्वर यांनी काम पाहिले. सरकार पक्षामार्फत ॲड. समीर तांबेकर आणि ॲड. पी. जी. जाधव यांनी काम पाहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय