शाहू स्मारक भवनात झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह कऱ्हाड, आदी भागांतून ५५ मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी व्याख्यान दिले.
स्पर्धेचा निकाल असा, कोल्हापूर महानगर पालिका गट : आदिती बळवंत जाधव, प्रसन्न जनार्दन ओंकार, श्रावणी प्रसाद हैबत्ती, श्रद्धा तानाजी जाधव, जिल्हा परिषद गट - आयुष कृष्णात पाटील, प्रतीक्षा सुरेश येरूडकर, जोया अब्दुलरहिम मुल्ला, शुभम आनंदा राणे. कऱ्हाड ग्रुप - साजिरी जगदीश कुंभार, हर्षवर्धन विजय पाटील, अथर्व अशोक पिसाळ, मधुजा तानाजी सुर्वे यांचा समावेश आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शिक्षणाधिकारी किरण लोहार, आदी मान्यवरांच्या उपस्थित झाला. स्वागत व प्रास्ताविक अशोक पोवार यांनी केले. रमेश मोरे यांनी आभार मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, किसन कल्याणकर, विजय सुतार, राजू कोरे, प्रभाकर लोखंडे, युवराज कदम, आदी उपस्थित होते.
फोटो : १५०३२०२१-कोल-प्रतिष्ठान
ओळी : कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.