शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

बालगोपाल, पाटाकडील साखळी फेरीत-फुलेवाडी, खंडोबा संघांचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:38 AM

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-१ असा, तर बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा

ठळक मुद्दे अटल चषक फुटबॉल स्पर्धा

 कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-१ असा, तर बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर ४-२ असा पराभव करीत साखळी फेरी गाठली. 

शाहू स्टेडियमवर गुरुवारी (दि. ५) पावसामुळे थांबलेला पाटाकडील ‘अ’ व फुलेवाडी यांच्यातील सामना शुक्रवारी दुपारी झाला. प्रारंभापासून ‘पाटाकडील’ने वर्चस्व राखले. ५१व्या मिनिटाला ‘पाटाकडील’च्या हृषिकेश मेथे-पाटीलने ‘डी’ बाहेरून मारलेल्या फटक्यावर उत्कृष्ट गोल नोंदवीत संघाला १-० आघाडी मिळवून दिली. ‘फुलेवाडी’कडून सामन्यात बरोबरी साधण्यासाठी सूरज शिंगटे, नीलेश ढोबळे, निखिल जाधव, आदींनी जोरदार प्रयत्न केले. ६२व्या मिनिटाला नीलेश ढोबळेने गोल नोंदवीत सामन्यात फुलेवाडी संघाने १-१ अशी बरोबरी साधली. बरोबरीनंतर दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमक चढाया केल्या.

७४व्या मिनिटाला ‘पाटाकडील’कडून पुन्हा हृषिकेश-मेथे पाटीलने हेडद्वारे अप्रतिम गोल नोंदवीत सामन्यात संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनतर ८०व्या मिनिटाला ‘पाटाकडील’च्या ओबे अकीमने ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक निखिल खाडे पुढे आल्याची संधी साधत गोल नोंदविला. पाटाकडील ‘अ’ने ३-१ असा सामना जिंकला.

दुसरा सामना बालगोपाल व खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. ‘बालगोपाल’कडून सूरज जाधव, सचिन गायकवाड, प्रतीक पोवार, दिग्विजय वाडेकर, गोलस्की यांनी; तर ‘खंडोबा’कडून सागर पोवार, विक्रम शिंदे, प्रतीक सावंत, कपिल शिंदे यांनी चढाया केल्या. मात्र, अखेरपर्यंत दोन्ही संघास गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे मुख्य पंच प्रदीप साळोखे यांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यात ४-२ ने बालगोपाल तालीम मंडळाने बाजी मारीत साखळी फेरी गाठली.टायब्रेकर असा‘बालगोपाल’कडून रोहित कुरणे, दिग्विजय वाडेकर, प्रतीक पोवार, प्रसाद सरनाईक यांनी गोल केला; तर सचिन गायकवाडचा फटका वाया गेला. ‘खंडोबा’कडून रणवीर जाधव, आशिष चव्हाण यांनी गोल केला; तर विक्रम शिंदे, ओंकार चौगले यांचे फटके वाया गेले.

‘बालगोपाल’चा गोलरक्षक निखिल खन्ना व ‘खंडोबा’चा गोलरक्षक रणवीर खालकर यांना सामन्यादरम्यान पंचांनी ‘डी’बाहेर येऊन चेंडू अडविल्याच्या कारणावरून रेड कार्ड दाखविले. अशा प्रकारे एकाच सामन्यात दोन्ही गोलरक्षकांना रेड कार्ड देण्याची घटना कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात प्रथमच घडली आहे, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर