कोल्हापूर : जागतिक वारसा लाभलेल्या राधानगरी अभयारण्याचे संवर्धन आणि पर्यटन यामध्ये समतोल राखला जावा, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी केले. यावेळी त्यांनी नव्या लोगाेमुळे अभयारण्याची ओळख जगभरातील नागरिकांना होईल असेही मत व्यक्त केले.
राधानगरी अभयारण्याच्या नव्या लोगोच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, पुराभिलेख विभागाचे अभिलेखापाल गणेश खोडके, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, लोगो निर्मिती करणारे सुनील गरुड, इतिहास अभ्यासक राम यादव, ऋतुराज इंगळे, रविराज कदम उपस्थित होते.
प्रास्ताविकात विशाल माळी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज राखीव ठेवलेल्या दाजीपूर परिसरातील जंगलाचे १९५८ मध्ये राज्यातील पहिले अभयारण्य निर्माण करण्यात आले. त्याचा विस्तार करून १९८५मध्ये राधानगरी अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. जुन्या लोगोतील त्रुटी दूर करून कलाकार सुनील गरुड यांनी नवीन लोगो तयार केला असल्याची माहिती दिली.
---
असा आहे नवा लोगो
राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा, राधानगरी अभयारण्याचे वैशिष्ट्य असणारा गवा, अंजन, बिबट्या, राज्यप्राणी शेकरू, फुलपाखरू, पक्षी, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या दप्तरी इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलेल्या अक्षरावरून राधानगरी हे शब्द इंग्रजीमध्ये तसेच मराठीमधील शब्दाचा समावेश आहे.
---
फोटो नं १९०३२०२१-कोल-राधानगरी लोगो
ओळ : राधानगरी येथे गुरुवारी राधानगरी अभयारण्याच्या नव्या लोगोचे अनावर शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशांत सातपुते, गणेश खोडके, विशाल माळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
---