कोल्हापूर : राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये जाहीर केलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रिया होत आहे. या अंतर्गत कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात तीन बॅन्डसमन पदासाठी शुक्रवारी (दि. ३) सप्टेंबरला, तर पोलीस शिपाई भरती गौरी गणपती विसर्जनानंतर लेकी परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्यात २०१९साली तत्कालीन सरकारने पोलीस शिपाई पदाची भरती घेण्याबाबत संबंधित पोलीस घटक प्रमुखांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भरती प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत पोलीस अधीक्षक , कोल्हापूर अंतर्गत तीन बॅन्डसमन व पोलीस शिपाई पदांकरिता भरती होणार आहे. यातील बॅन्डसमनच्या तीन जागा रिक्त आहेत. त्याकरिता ६२१७ अर्ज आले आहेत. त्या तीन जागांकरिता शुक्रवारी (दि. ३) ला लेखी परीक्षा होणार आहे. तर शिपाई पदाकरिता गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर सोईने तारीख निश्चित केली जाणार आहे. याबाबतचे आदेश एका पत्रकान्वये राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी काढले आहेत.