शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बँक दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या बेळगावच्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 2:27 PM

कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील तिघा दरोडेखोरांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांचा आणखी एक साथीदार अंधारात फायदा घेत पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. या टोळीकडे कळे येथील बँकेवरील दरोडा आणि कणेरीवाडी येथील वृद्धेचा खून करून लूटमार या दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी सुरूआहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देबँक दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या बेळगावच्या टोळीला अटककारसह घरफोडीचा मुद्देमाल जप्त : एकजण पसार

कोल्हापूर : कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील तिघा दरोडेखोरांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांचा आणखी एक साथीदार अंधारात फायदा घेत पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. या टोळीकडे कळे येथील बँकेवरील दरोडा आणि कणेरीवाडी येथील वृद्धेचा खून करून लूटमार या दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी सुरूआहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.संशयित जिफान शाबुद्दीन अन्निवले (२३), रफिक खतालसाब पठाण (२३, दोघे रा. उज्ज्वलनगर, बेळगाव), मंजुनाथ बसवराज पाटील (२५, रा. वीरभद्रनगर, फस्टमेल बेळगाव), यासीन उस्मान धारवाडकर (२३, रा. शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार पळून गेला. त्यांच्याकडून कार, आॅक्सिजन सिलिंडर टाकी, घरगुती वापरातील गॅस टाकी, गॅसगन, दोन लोखंडी कटावण्या, दोन पक्कड, दोन कटर, लायटर, हेल्मेट, बॅटरी, माकड टोपी, हातमोजे, जर्किन, कॅन, पाईप, नंबरप्लेटा, कागदपत्रांचे झेरॉक्स, तीन मोबाईल असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.जिल्ह्यात महिन्याभरात घरफोडी, चोरीचे प्रकार घडत आहेत. सर्व पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपअधीक्षक कार्यालयांना रात्रगस्तीसह शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी चार विशेष पथके तयार करून, जिल्ह्यात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

रविवारी रात्री पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलजवळील उड्डाण पुलावर कार (एम. एच. ०७ बी-४४५) थांबून असून त्यामध्ये पाच लोक आहेत. त्यांच्या हालचाली संशयास्पद असून, ते चोरटे असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलीस उपनिरीक्षक दादासो पवार यांना दिली. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कागलकडे धाव घेतली.

संशयित कारवर झडप टाकण्यासाठी पोलीस धावले असता, त्यांची चाहूल लागून दरोडेखोर पळून जाऊ लागले. यावेळी थरारक पाठलाग करून चौघांना पकडले. एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यांच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये दरोड्याचे साहित्य सापडले. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बँकेची रेकी करून दरोड्याचा प्रयत्नसंशयित दरोडेखोरांकडे कसून चौकशी केली असता, एक महिन्यापूर्वी त्यांनी गडमुडशिंगी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेची रेकी केली होती. या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक असल्याने त्यांनी तेथील प्लॅन रद्द केला. त्यानंतर २० फेब्रुवारीला कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची रेकी केली. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने रविवारी मध्यरात्री या बँकेवर दरोडा घालण्याचा प्लॅन होता, अशी कबुली संशयित जिफान अन्निवले याने दिली. त्यांनी यापूर्वी आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.कारचा नंबर बदललासंशयितांकडे मिळून आलेल्या कारचा नंबर मूळ नंबर (एम. एच. ०९ एबी ९२६६) असा आहे. त्यांनी ही नंबरप्लेट काढून बनावट नंबर (एम. एच. ०७ बी-४४५) लावला होता. प्रत्येकवेळी ते नंबरप्लेट बदलून कर्नाटक-महाराष्ट्रात फिरत होते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर