शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

कोल्हापुरात बाप्पांच्या विसर्जनाला राजकीय झालर, फलकबाजीने दक्षिणचे राजकारण ढवळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 7:51 PM

अमर पाटील  कळंबा: बुद्धीदाता, विघ्नविनाशक मंगलमूर्ती श्री गणेशाला शनिवारी कोल्हापूरकरांनी जडअंत:करणाने निरोप दिला. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन ...

अमर पाटील कळंबा: बुद्धीदाता, विघ्नविनाशक मंगलमूर्ती श्री गणेशाला शनिवारी कोल्हापूरकरांनी जडअंत:करणाने निरोप दिला. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर उभारलेल्या कमानी अन् फलकबाजीमुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिवसेना शिंदे गटाचे, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात उभारलेल्या कमानी आणि मोक्याच्या ठिकाणी केलेली महाकाय फ्लेक्सच्या जाहिरातबाजीने दक्षिणच्या पारंपरिक काँग्रेस-भाजपच्या पक्षीय राजकारणा आडून होणाऱ्या पाटील-महाडिक राजकारणात आता क्षीरसागर यांनी उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. घरगुती गौरीगणेश विसर्जनाचे औचित्य साधून इराणी खाणीलगत, कळंबा- गारगोटी रस्त्यावर व अन्य मोक्याच्या ठिकाणी स्वागत कमानीसह 'दक्षिण ना उत्तर : कोल्हापूरचे विकासपर्व दक्षिणोत्तर' अशा आशयाची मोठी फ्लेक्स उभारण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप शाखांचे उद्घाटन करताना दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन २०२४ ला अमल महाडिकच भाजपचे उमेदवार असणार हे जाहीर केले. तर, आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस गटनेत्यांच्या वाढदिवसाच्या नागरी सत्कार सोहळ्यात आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत भाजपवर तोंडसुख घेतले होते.  यातच दक्षिणच्या राजकारणात आता क्षीरसागर यांनी उडी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील काका पुतण्याजोडीने लक्ष घातल्याने माजी आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ झाले होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणाने आमदार सतेज पाटील माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यातील कटुता कमी झाली. त्यामुळे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यपुढे नवीन समस्या वाढल्या. राजेश क्षीरसागर यांच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोल्हापूरचे विकासपर्व दक्षिणोत्तर या फ्लेक्सबाजीने त्यांना नेमके काय साधायचे आहे याचे उत्तर येणारा काळच ठरवेल. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक