प्रा. भोसले पाटील यांचे नाव संचालक शहाजी पाटील यांनी सुचविले. निवडीनंतर डॉ. जाधव यांच्या हस्ते प्रा. भोसले पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर डॉ. जाधव, सहाय्यक अधिकारी विजय पाटील, मावळते उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी खासदार मंडलिक म्हणाले, प्रा. भोसले-पाटील यांचे कारखान्याच्या वाटचालीत योगदान आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा व ज्ञानाचा यापुढेही लाभ होणार आहे.
या वेळी प्रा. भोसले म्हणाले, स्व. मंडलिकांच्या धोरणानुसार व खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली संचालकांच्या सहकार्याने कारखाना हितासाठी प्रयत्नशील राहू. या वेळी कारखान्याचे मावळते उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्वागत कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. या वेळी संचालक दिनकर पाटील, शंकर व्यंकू पाटील, आप्पासाहेब तांबेकर, दतात्रय सोनाळकर, शहाजी पाटील, वीरेंद्र मंडलिक, ईगल प्रभावळकर, दत्तात्रय चौगले, मसू पाटील, जयसिंग गिरीबुवा, प्रदीप चव्हाण, संचालिका सौ. नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे, सौ. राजश्री बाळासो चौगुले, कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील उपस्थित होते. आभार संचालक मारुती काळुगडे यांनी मानले.
कॅप्शन
हमीदवाडा कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रा. बापूसाहेब भोसले यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना डॉ. एस. एन. जाधव, या वेळी खासदार संजय मंडलिक, एन. वाय. पाटील आदी.
छाया : जे. के. फोटो