शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:47 AM

काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे.

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विकाऊ लोकांची सौदेबाजी झाली. खुलेआम लोकशाहीची थट्टा करण्यात आली. मतदारांनी निवडून दिले म्हणून सौदेबाजी करून त्यांनी कमाई केली. म्हणून सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी रविवारी केले.

जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे वितरण आयोजित पुरस्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 'गांधीजींच्या खुनानंतर ७५ वर्षांनी त्यांची आपल्याला आवश्यकता . आहे का?' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी 'जगन फडणीस स्मृतीशोध पत्रकारिता पुरस्कार' दिल्ली येथील साहित्यिक आणि इतिहास संशोधक अशोककुमार पांडेय यांना देण्यात आला. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्था आणि लोकशाहीची खिल्ली उडविण्यात आली. काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे. बिल्कीस बानू या महिलेवर बलात्कार करून हत्या केलेले आरोपी उच्चवर्णीय असल्याने सुटल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सध्याच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभा केले जात आहे.पांडेय म्हणाले, महात्मा गांधी यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या जातीय अस्मिता टोकदार बनवल्या आहेत. जातीय हिंसा घडवून आणले जात आहे.यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, ओमप्रकाश कलमे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. निशिकांत चाचे यांनी आभार मानले.समाज गप्प म्हणून

  • गेल्या आठ वर्षांत संविधानात अनेक बदल करण्यात आले. जातीय हिंसा झाल्या. मॉब लिचिंगच्या घटना झाल्या,
  • लोकशाहीतील संस्था डळमळीत करण्यात आल्या. तरीही समाज गप्प आहे. त्यामुळे वाईट घटना वाढत आहेत, असे मत गांधी यांनी व्यक्त केले.

अश्रू अनावर

  • राजस्थानमधील दलित मुलाची माठातील पाणी प्यायल्याने हत्या झाली. तरीही समाजाकडून अपेक्षित उठाव झाला नाही.
  • ही घटना सांगताना गांधी यांना अश्रू अनावर झाले. इतकी गंभीर घटना घडूनही पंतप्रधानाकडून दुःख व्यक्त केले नाही. नाटकी अश्रूही काढले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस