राजाराम लोंढे/गणेश शिंदे - कोल्हापूरचार प्रभागांच्या हद्दीत उत्तरेश्वर परिसराचा विकास अडकला आहे. सांडपाण्याचा निचरा, घाणीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य, कचरा उठावाचा उडालेला बोजवारा यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. समस्यांबाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकजण हात वर करत असल्याने समस्या मांडायच्या कुणाकडे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. मीराबाग, दुधाळी, शुक्रवार गेट व पंचगंगा तालीम या चार प्रभागांत उत्तरेश्वर परिसर विभागला आहे. परिसरात प्रामुख्याने कचऱ्याचा प्रश्न नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. कचऱ्याचे ढीग आहेत, पण त्याचा उठाव वेळेत होत नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कचरा उठावाबाबत सांगितले तर हा परिसर आमच्या प्रभागात येत नाही, असे धडधडीत उत्तर देतात. स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नसल्याने कमालीची दुर्गंधी पसरलेली आहे. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून औषध फवारणीची मागणीही नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक शौचालयांची साफसफाई केली जात नसल्याने येथून जाताना नाक बंद करूनच जावे लागते. ‘गणपतराव माने’ हॉलची डागडुजी करणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे मत आहे. न्यायमूर्ती रानडे विद्यालय बंद पडले आहे. येथील इमारतीचा वापर गोडावून म्हणून केला जातो. ही शाळा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे. दुधाळी मैदानाच्या मध्य भागातून ड्रेनेज गेले आहे, वळवाचा पाऊस जरी आला तरी ड्रेनेजमधील मैलामिश्रित पाणी थेट मैदानात पसरते. या मैदानाच्या संरक्षणभिंंतीही अनेक ठिकाणी कोसळलेल्या आहेत, पण स्थानिक नगरसेवकांचे तिकडे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.कूपनलिकेच्या चाव्या पूर्ववत सुरू कराअनेक वर्षांपासून या परिसरात कूपनलिकेवर चाव्या बसवण्यात आल्या होत्या. हे पाणी इतर वापरासाठी उपयोगी पडत होते, पण गेले अनेक दिवस येथील चाव्या बंद आहेत. त्याकडे स्थानिक नगरसेवकांसह सर्वांचेच दुर्लक्ष आहे. या चाव्या सुरू केल्या तर पिण्याच्या पाण्यावरील ताण आपोआपच कमी होऊन पाण्याची बचत होऊ शकेल, असे नागरिकांचे मत आहे. ‘लोकमत’बद्दल विश्वासउत्तरेश्वर परिसरातील समस्यांबाबत गेले अनेक वर्षे महापालिका प्रशासनाकडे तक्रारी मांडल्या आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ‘लोकमत’ने आमच्या दारात येऊन समस्या मांडून महापालिका प्रशासनाला जागे करण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे येथील समस्यांचे निश्चितच निराकरण होईल, असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला. कचऱ्यासाठी पिशव्या द्याओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक कुटुंबाला पिशव्या द्याव्यात. त्याचबरोबर पुन्हा कूपनलिकेच्या चाव्या सुरू कराव्यात. - संजय यादवस्वच्छतागृहांची गरजकचरा उठाव होत नाही. स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी. स्वच्छतागृहे नसल्यामुळे गैरसोय होत आहेत. - सनी अतिग्रेगॅसची समस्यागॅसवितरक गॅस देताना २१ दिवसांची अट नसताना ग्राहकाला त्रास देतात. - मीरासाहेब अत्तारडासांचे साम्राज्यवेळेवर गटारी स्वच्छ न केल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. गटारी स्वच्छ करून औषध फवारणी करावी. - अनंत अशोक पाटीलसभागृहाचे नूतनीकरणउत्तरेश्वर पेठेकडे जाणाऱ्या गणपतराव माने सभागृहाचे नूतनीकरण करावे. त्याच्या शेजारीच्या शौचालयांची साफसफाई होत नाही.- सुरेश कदम, वृत्तपत्र विक्रेतेकचरा उठावात दुजाभावउत्तरेश्वर पेठ चौक चार प्रभागांत येतो. त्यामुळे या ठिकाणी कचरा उठावासाठी महापालिकेचे कर्मचारी हा प्रभाग आमच्या हद्दीत येत नाही, असा दुजाभाव करतात. - एकनाथ पोवारस्वच्छता होत नाहीउत्तरेश्वर पेठेतील स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नाही. त्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. - श्रीकांत चव्हाणअस्वच्छ गटरीगटारींची स्वच्छता होत नाही. महापालिकेने मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून द्यावी.- मालती मडकेऔषध फवारणी करागवत मंडई परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात वेळेवर औषध फवारणी व्हावी. स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करतात.- सुनीता आनंदराव सुतारड्रेनेजची समस्या कायमगेल्या १५ वर्षांपासून ड्रेनेजची समस्या मोठी आहे. अस्वच्छ गटारीमुळे आरोग्याच्या समस्या आहेत.- भगवान चव्हाण मैदानाची दुरवस्थादुधाळी मैदानाची संरक्षक भिंत कित्येक महिन्यांपासून पडून आहे. मैदानाच्या मध्यभागी ड्रेनेज वाहिनी असल्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी बाहेर येते. - युवराज जाधवहॅलोजन बसवारानडे विद्यालयाजवळ रोज रात्री मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके होतात. याठिकाणी हॅलोजन लावावा,अशी मागणी स्थानिक नगरसेविकांकडे केली पण अद्यापही काम झालेले नाही.- आकाश मोरेएकेरी वाहतूक करापंचगंगा घाटावर बीओटी तत्त्वावर स्वच्छतागृह बांधावे तसेच शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ वाहतुकीची समस्या वाढत आहे. यासाठी हा मार्ग एकेरी करावा.-किशोर घाटगेपार्किंगची समस्यारस्ते खराब आहेत. विद्युत खांबांवर पुरेशी विद्युत व्यवस्था नाही. प्रत्येक घरासमोर गाड्या असल्यामुळे पार्किंगची समस्या भेडसावत आहेत.- वंदना बाबासाहेब सूर्यवंशीलोकमतआपल्या दारी
‘उत्तरेश्वर’च्या विकासाला हद्दीचा अडथळा
By admin | Published: March 31, 2015 12:03 AM