लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना व महापूर अशा संकटकाळातही सभासद व ठेवीदारांनी संस्थेवरील विश्वास ढळू दिला नाही. या आर्थिक वर्षात संस्थेला १९.८५ लाखांचा नफा झाला आहे, अशी माहिती श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.
पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मध्यवर्ती हातमाग संस्थेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सुरुवातीला संस्थेचे संस्थापक कै. ज्ञानबा दत्तवाडे व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. त्यानंतर अशोक चनविरे यांनी आर्थिक वर्षात निधन झालेल्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या दुखवट्याचा ठराव मांडला.
सचिव बंडू माळी यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभेसाठी गजानन सुलतानपुरे, विजयकुमार हावळे, मलगोंडा पाटील, अरविंद चंदुरे, दत्तात्रय कुंभोजे, सुरेखा दत्तवाडे, सरस्वती माळी आदींची उपस्थिती होती. उपाध्यक्ष बाळासाहेब देवनाळ यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०१
श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी मार्गदर्शन केले.