शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

तुळशी धरण भरण्यास लोंढा प्रकल्पाचा आधार

By admin | Published: August 08, 2016 11:30 PM

शेतीसाठी वरदान : तुळशीच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात ७७ टक्के पाणीसाठा

 श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोड राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणारा परिसर म्हणजे तुळशी-धामणीचा काठ. या काठावर पावसाळ््याच्या दिवसांत सरासरी एवढा पाऊस होऊनदेखील या परिसराचे ‘वरदान’ असणारा ‘तुळशी’ तलाव गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरू शकलेला नाही. तुळशी तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार यात कोणतीच शंका नाही. कारण या लोंढा-नाला प्रकल्पातून जादा होणारे पाणी यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात मिसळत असल्याने तलावाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात ७७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तुळशी तलाव हा या परिसरातील लोकांसाठी वरदान आहे. राधानगरी, करवीरसह पाणी टंचाईच्या काळात इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा करणारा हा तलाव या तुळशी नदी तीरावरील जवळपास ८८५५ एकर क्षेत्र ओलिताखाली आणतो. पण २०१३ पासून मात्र हा तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. परिणामी, या नदीकाठावरील लोकांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना दोन वर्षांत सामोरे जावे लागले. याची उदाहरणे ताजी आहेत. दुसरीकडे १९७६ नंतर देखील फक्त १६ वेळाच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याच्या नोंदी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात केलेल्या पहावयास मिळतात. तुळशी धरणदेखील काहीवेळा पूर्ण क्षमतेने भरू शकत नसल्याच्या कारणास्तव या धरणापासून लगतच तुळशी तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या ‘बैलगोंड’ ओढ्यावर जर लघुपाटबंधारे प्रकल्प उभा केला, तर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जादा पाणी प्रकल्पाच्या नियोजित उजव्या बाजूच्या सांडव्यातून तुळशी तलावात सोडता येईल व याचा फायदा तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास होईल, या उद्देशाने लोंढा-नाला प्रकल्पाची निर्मिती झाली. २००१ साली डी. सी. पाटील कन्स्ट्रक्शनने या प्रकल्पाचे काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली. १० कोटी ७३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले. पण मध्यंतरी निधीची कमतरता व सक्षम नेतृत्त्वाचा अभाव यामुळे हा लोंढा- नाला प्रकल्पही रखडला आणि लोंढा नाल्याचे पाणी ‘तुळशी’त येण्याची शक्यता थंडावली. प्रकल्पाची ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४यावर्षी लोंढा-नाला प्रकल्पातून अतिरिक्त होणारे पाणी प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात २०० ते ३०० क्युसेक येत असल्याने तुळशी जलाशयाच्या पातळीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे. ४सध्या धरणात ७७ टक्के इतका पाणीसाठा असून, आॅगस्टअखेर धरण भरण्याची खात्री पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. असे झाल्यास याचा फायदा तुळशी काठावरील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. ४शासनाने एक चांगला उद्देश ठेवून हा प्रयोग राबवला असून, त्याला यशही आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.