शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मातब्बरांचे गुडघ्याला बाशिंग

By admin | Published: December 11, 2015 11:15 PM

‘कुंभी-कासारी’चे रणांगण : प्रचाराला प्रारंभ, उमेदवारी मिळणारच या आशेवर माघारीपूर्वी भेटीगाठी

प्रकाश पाटील -- कोपार्डे--कुंभी-कासारी निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी गटातील मातब्बरांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सत्ताधारी गटातील आमदार नरके गटातून यावेळी विद्यमान संचालकांपैकी १० ते १२ संचालकांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे चित्र असून प्रत्येक गटातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत, तर विरोधी गटातील मातब्बरांपैकी आणि या निवडणुकीसाठी रिंगणात नसणार असे जाहीर केले होते तेच आता प्रचाराला लागले आहेत. यामुळे माघारीपूर्वीचे ‘कुंभी’चे कार्यक्षेत्र राजकीय हालचालीने ढवळून निघाले आहे.१५ डिसेंबर ही माघारीची तारीख असून सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके व विरोधी शाहू आघाडीकडून उमेदवार निवडीला वेग आला आहे. आ. चंद्रदीप नरके यांच्याकडे पॅनेलमध्ये स्थान मिळावे म्हणून इच्छुकांकडून दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. प्रत्येक गटातून इच्छुक असणारे आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह नरके गटाचे मुख्य केंद्र असणाऱ्या आ. नरकेंच्या शिवाजी पेठेतील बंगल्यावर शक्तिप्रदर्शन करत आहेत. आ. नरके गटाकडे इच्छुकांची मोठी रांग असून उमेदवारी नाकारल्यानंतर निर्माण होणाऱ्या असंतोषाला कसे रोखायचे हा प्रश्न आ. नरके यांच्यासमोर आहे.सध्या ‘कुंभी कासारी’मध्ये आ. चंद्रदीप नरकेंची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीसाठी २१ संचालक मंडळाचे बोर्ड असून मागील वर्षीपेक्षा ती संख्या ४ ने कमी झाल्याने पुन्हा अडचणी आ. नरकेंसमोर आहेत. सध्या विद्यमान असणाऱ्या संचालकांपैकी सर्वच्या सर्व याही निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. सध्या गट नं. ५ मधून स्वत: आ. चंद्रदीप नरके, विद्यमान संचालक पी. डी. पाटील, सुभाष पाटील (लोंघे) यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे एका मेळाव्यादरम्यान ठरल्याचे वृत्त आहे. गट नं. १ मधून अनिल पाटील, विलास पाटील व शंकर पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी शेवटच्या टप्प्यात बदल झाला तरच असे सांगितले जात आहे. गट नं. २ मध्ये किशोर पाटील, दादासो लाड या विद्यमान संचालकांबरोबर महिला संचालक अनिता पाटील यांचीही दावेदारी आहे. गट नं. ३ मध्ये संजय पाटील (खुपीरेकर) यांचे नाव निश्चित असून कृष्णात पाटील, भगवान पाटील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील यांची चर्चा असून गट नं. ४ मध्ये जयसिंग पाटील- ठाणेकर, आनंदराव माने यांची नावे निश्चित आहेत.निवडणूक लढविणार नाही म्हणणारेच पुढे...निवडणूक लढविणार नाही म्हणणारेच पुढे...विरोधी शाहू आघाडीतून काही दिवसांपूर्वी आपण निवडणूक लढवणार नाही, असे म्हणणारे नेते पुंडलिक पाटील, तुकाराम पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे प्रदर्शन केले आहे. गट नं. १ मधून एस. के. पाटील, बाळ पाटील व बी. बी. पाटील यांची नावे निश्चित आहेत. गट नं. २ मधून बाजीराव खाडे, पुंडलिक पाटील आघाडीवर आहेत. गट नं. ३ मधून तानाजी मोरे, बुद्धीराज पाटील, तुकाराम पाटील ही नावे आघाडीवर आहे. गट नं. पाचमधून प्रकाश देसाई, संदीप नरके व वैकुंठनाथ भोगावकर अशी उत्पादक गटातील प्रतिनिधींची मांडणी झाली आहे.राखीव गटातील उमेदवार निवडताना पॅनेलप्रमुख मतदानाचा आकडा व राजकीय समीकरणे बघून महिला प्रतिनिधी, भटक्या व विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवार निश्चित होणार आहेत. महिला गटासाठी दोन्ही गटांकडून ज्या गावात जास्त मतदान आहे त्या गावांना प्राधान्य असणार आहे. सत्ताधारी व विरोधी गटातील नेत्यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून प्रचाराचा धडाका लावला आहे.