शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणारा बास्केट ब्रिज दोन वर्षात पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 6:40 PM

महापुरामुळे शहराचा संपर्क तुटू नये यासाठी या ब्रीजची उभारणी

सतीश पाटीलशिरोली : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे होणाऱ्या बास्केट ब्रिजमुळे कोल्हापूरच्या सौंदर्यात भर पडणार असून हा ब्रिज दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा या ब्रिजचे काम मिळालेल्या रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लि. या कंपनीने केला आहे. या बास्केट ब्रिजच्या कामाचा पायाभरणी शुभारंभ नुकताच शनिवारी (दि.२८) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिरोली सांगली फाटा येथे झाला आहे. या ब्रिजचे काम पुणे येथील रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लि. या कंपनीला मिळाले आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथून पूर्वेकडील सेवा मार्गावरुन शहरात येण्यासाठी या बास्केट ब्रिजची सुरुवात होणार आहे. १३०० मीटर बास्केट ब्रिजची लांबी असून या ब्रिजचे दुसरे टोक शिरोली जकात नाका इथे असणार आहे. या ब्रिजसाठी सुमारे १८० कोटी निधी प्रस्तावित असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. महापुरामुळे शहराचा संपर्क तुटू नये यासाठी या ब्रीजची उभारणी करण्यात येणार आहे. या ब्रीजमुळे वाहतूक कोंडीची समस्याही सुटणार आहे. विशेष म्हणजे महापूर काळात पुणे-बंगळूरू महामार्ग बंद होतो. मात्र, हा ब्रीज उभारल्यानंतर महापूर काळातही पुणे-बंगळूरू महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणार आहे. 

शिरोली सांगली फाटा ते शिरोली जकात नाका पर्यंत १३०० मीटर चा बास्केट ब्रिज होणार आहे. याचे काम रोडवे सोल्युशन इंडिया इंन्फ्रा.लि कंपनीला मिळाले असून हा बास्केट ब्रिज २ वर्षात पूर्ण होणार आहे. - वैभवराज पाटील, प्रकल्प व्यवस्थापक, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा.लि.कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणारा आणि महापुरामुळे शहराचा संपर्क तुटू नये यासाठी बास्केट ब्रिज होणार आहे. ब्रिज पूर्ण झाल्यानंतर जरी पंचगंगा नदीला पुर आला तरी शहराचा संपर्क तुटणार नाही. तसेच वाहतूक कोंडी सुद्धा होणार नाही. -वसंत पंदरकर - राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर