गडहिंग्लज :
गिरणी कामगार व वारसांना मध्य मुंबई येथे मोफत घरे आणि पेन्शनधारकांच्या हक्कासाठी लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार सर्व श्रमिक संघ लाल निशाण संघटनेतर्फे आयोजित येथील मेळाव्यात करण्यात आला. कॉ. अतुल दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यात आली. त्यानंतर कॉ. दिघे, आजरा तालुकाध्यक्ष कॉ. शांताराम पाटील, तानाजी कुरळे यांनी मार्गदर्शन केले.
मध्य मुंबईत मोफत घरे, ७५०० पेन्शन व महागाई भत्ता त्वरित मिळावा, इपीएफमध्ये समाविष्ट नसलेल्या कामगारांची नोंदणी करून त्यांना ५००० ची पेन्शन सुरू करावी व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्यास गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कॉ. पद्मिनी पिळणकर यांनी प्रास्ताविक केले. कॉ. अमृत कोकितकर यांनी आभार मानले.
------------------------------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात कॉ. अतुल दिघे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित गिरणी कामगार.
क्रमांक : १७०१२०२१-गड-१०