शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

आत्मसन्मानाची लढाई/ गौर हरी दास्तान : स्वकीयांशी युध्द करणारा स्वातंत्रसैनिक

By admin | Published: November 23, 2014 9:01 PM

ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे

पणजी : विनय पाठक यांचा संयमित अभिनय, रजत कपूर, कोंकणा सेन, रणवीर शौरी, तनिष्ठा चॅटर्जी यांनी दिलेली साथ यातून साकारलेला गौर हरी दास्तांन या हिंदी चित्रपटाने प्रेक्षकांच्या चांगल्या अपेक्षा उंचावल्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी आश्चर्य वाटणार इतका तो प्रभावी आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे यासाठी कौतुक केलेच पाहिजे. गौर हरी दास्तान ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे. १९७२ मध्ये ओरिसामधील बालासोर या गावातली ही मुले महात्मा गांधी यांच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात भाग घेतात. मुलांसाठीच्या वानर सेनेमध्ये सहभागी झालेला गौर हरी दास हा त्यातलाच एक मुलगा. स्वातंत्रसैनिकांशी संदेशाची देवाण-घेवाण करणे हे त्यांचे काम. शाळेवर फडकणारा युनियन जॅक काढून तिथे तिरंगा ध्वज फडकावणारा गौर हरी दास याला ९0 दिवस कारावासाची शिक्षा मिळते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गौर हरी दास त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह ते मुंबईत रहायला येतात. मुलाला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे स्वातंत्र्यसैनिक म्हणून कोणतेही प्रमाणपत्र नसते. आपण स्वातंत्र्याची लढाई कोणत्या प्रमाणपत्रासाठी किंवा पेन्शनसाठी केली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मागण्याचा प्रश्नच नाही, असे उत्तर देणाऱ्या गौर हरी दास यांना मुलाच्या भविष्यासाठी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करतात. पण त्यांना नोकरशाहीशी लढावे लागते. गौर हरी दास सतत २२ वर्षे ही लढाई लढत राहतात. स्वातंत्रसैनिक असल्याचे सांगणाऱ्या गौर हरी दास यांची त्यांच्या पाठीमागे टर उडविली जात होती. ते त्यांना खोटारडा म्हणून चिडवित असतात. ज्या सोसायटीत ते रहात असतात त्याचे ते अध्यक्ष असतात. ते पद त्यांना सोडण्यास भाग पाडायचे ते प्रयत्न करतात. बातमीदाराच्या मदतीने अखेर गौर हरी दास यांना ओरिसातील बालासोर येथील तुरुंगाधिकाऱ्याच्या डायरीत त्यांच्या ९0 दिवसांच्या तुरुंगवासाची नोंद मिळते आणि ती डायरी पुरावा म्हणून सरकारला सादर केल्यानंतर अखेर लोकलाजेस्तव सरकारला गौर हरी दास यांना स्वातंत्रसैनिकाचे प्रमाणपत्र द्यावे लागते. गौर हरी दास्तान चित्रपटात गौर हरी दास ही विनय पाठक यांनी केलेली भूमिका त्यांच्या आजअखेर केलेल्या अभिनयाची कमाल आहे. अत्यंत साधा, गांधीवादी, प्रेमळ पिता आणि कणखर, जिद्दी स्वातंत्रसैनिक ज्या ताकदीने विनय पाठक यांनी उभा केला आहे, त्याला तोड नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून विनय पाठक यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुलाने झिडकारल्यानंतर भावविवश झालेला पिता, पत्नीच्या लाख समजावण्यानंतरही कागदपत्रे जमा करण्यासाठी पायपीट करणारा स्वातंत्रसैनिक, आपल्या मुलासाठी खादीचा शर्ट शिवण्यासाठी कापसाचे बी घेवून आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याशी त्यांनी केलेली बातचीत आणि शेवटी मुख्यमंत्र्यांकडून ताम्रपटाऐवजी केवळ सरकारी कागदावर मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारताना अतिशय नम्रपणे चहाची आॅफर नाकारुन भावविवश झालेले गौर हरी दास या अभिनयाची उत्तुंग छटा विनय पाठक ज्या सहजतेने दाखवितात, त्यामुळे या चित्रपटाला प्रचंड उंचीवर नेवून ठेवलेले आहे. चित्रपटात कोंकणा सेन यांनी गौर हरी दास यांच्या पत्नीची भूमिका केली आहे. मुलगा आणि वडील यांच्यातील ती दुवा आहे. मुलाला जेव्हा भारतात प्रवेश मिळत नाही, तेव्हा तो अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतो, तेव्हाची तिची घालमेल, भारतात परतल्यानंतर आपल्या वडीलांप्रती त्याचा असणारा आदर गौर हरी दासपर्यंत पोहोचविण्याची धडपड करणारी पत्नी आणि सोसायटीच्या लोकांकडून आरोप प्रत्यारोप होत त्यांच्या स्वातंत्रसैनिकच असण्यावर उपस्थित केलेला प्रश्न याला उत्तर देताना दुर्गेचे घेतलेले रुप कोकणा सेन यांनी समर्थपणे उभी केली आहे. रजतकपूरने साकारलेला जोशी वकील, रणवीर शौरीने साकारलेला पत्रकार, विक्रम गोखले यांनी साकारलेला मुख्यमंत्री या आणखीन काही ताकदीच्या भूमिका या चित्रपटात पहायला मिळतात. दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी केलेली मंत्र्याची भूमिका लक्षवेधी आहे. याशिवाय छोट्या छोट्या भूमिकेतून अनेक मराठी कलावंतांनी हा चित्रपट समृध्द केला आहे. मंत्रालयाजवळ वावरणाऱ्या लालची एजंटाची भूमिका करणारा भरत जाधव, मंत्रालयात काम करणारी नीना कुळकर्णी, सुनेची भूमिका करणारी नेहा पेंडसे, तुरुंगाधिकाऱ्याची भूमिका करणारे सुनील शेंडे, सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका करणारे भरत दाभोळकर यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत.अनंत नारायण महादेवन हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. चित्रपट, दूरदर्शन, नाटक आणि जाहिरात या क्षेत्रात ते १९८0 पासून काम करत आहेत. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे. जवळपास ७५ चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत, तर ३0 हून अधिक नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. जवळपास शंभराहून अधिक मालिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. त्यांनी जवळजवळ अकरा चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यांच्या मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाला पुरस्कारही मिळालेला आहे. एल. सुब्रमण्यम यांनी दिलेले संगीत हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपटाला स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर विजेता ध्वनीसंकलक रस्सूल पकुट्टी यांचा परीसस्पर्श लाभला आहे. चित्रपट परीक्षण : संदीप आडनाईक