शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

उदगाव जिल्हा परिषदेत तीन नेत्यांची लढाई

By admin | Published: February 09, 2017 10:12 PM

स्वाभिमानी, राष्ट्रवादी-काँग्रेस, शिवसेनेत लढत : उदगाव-अर्जुनवाड पं. स.साठी उमेदवारांची घालमेल

संतोष बामणे --जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात नवख्यांची गर्दी होत असल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये आमदार उल्हास पाटील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक व शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीन नेत्यांना उदगावचा गड राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उदगांव जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दीपाली जालिंदर ठोमके, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून भारती हंकारे व पल्लवी कांबळे, तर शिवसेनेकडून स्वाती सासणे व सीमा हंकारे यांनी जोर लावला आहे. स्वाभिमानी व भाजपची युती न झाल्याने स्वाभिमानीने स्वबळावर नारा उचलला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन युती केली आहे. तर शिवसेना व भाजपमध्ये युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ४२ हजारांहून अधिक मतदार असून, सर्वाधिक मतदार उदगावमध्ये असल्यामुळे निर्णायक ठरणार आहे. तर मौजे आगर, अर्जुनवाड, संभाजीपूर, चिंचवाड ही गावे तीन हजारांपर्यंत मतदार असलेली आहेत. तसेच हसूर, कनवाड, कुटवाड, घालवाडसह गावांचा समावेश असल्याने तीनही पक्षांना दमछाक करावी लागणार आहे. उदगाव पंचायत समितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेश मडिवाळ, लाजम मुजावर, बाळासाहेब कोळी, तर शिवसेनेकडून डॉ. आदम नदाफ यांचे नाव आघाडीवर आहे. तर अर्जुनवाड पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरयू प्रमोद पाटील, तर शिवसेनेकडून राजश्री खाडे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अलका मेडसिंगे, राजश्री चौगुले, नंदाताई खोत यांच्यासह नावे आघाडीवर असली तरी माघारीनंतरच खरी लढत पाहावयास मिळणार आहे. तीन नेत्यांची कसरतउदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांनी दीपाली ठोमके यांना निवडून आणून आपला गड शाबूत ठेवण्याचा विडा उचलला आहे. तर शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये युती झाली असून, यांनाही ताकद लावावी लागणार आहे. तर उदगावमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असून, आमदार उल्हास पाटील यांना या निवडणुकीत कस लावावा लागणार आहे.