आॅनलाईन लोकमतसुनील चौगले/आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी, दि. १५: महाआघाडीत झालेली बिघाडी, भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आक्रमकपणे रिंगणात उतरलेली कॉँग्रेस तर स्वताच्या गटाचे अस्तित्व सिध्द करण्यासाठी दोन्ही मातब्बरांसमोर शडडू ठोकलेल्या परिवर्तन आघाडी, या तिरंगी लढतीने ‘भोगावती’चे कुरूक्षेत्र चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ता अबाधीत राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे, तर कारखान्यासह करवीर व राधानगरीचे राजकारण आपल्या हातात घेण्यासाठी कॉँग्रेसची धडपड सुरू आहे. देशात अग्रेसर असणाऱ्या कारखाना सध्या अखेरची घटका मोजत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकावर आरोपप्रत्यारोप करत असले तरी कारखान्यांची या अवस्थेला कोण जबाबदार आहे, याची जाण ‘भोगावती’च्या सूज्ञ सभासदांना आहे. राष्ट्रवादीच्या काळात प्रशासक आले, त्यामुळे त्यांना एकसंधपणे निवडणूकीला सामोरे जाऊन पुन्हा सत्ता घेण्याची मोठी संधी होती. पण राधानगरी तालुक्यातील दोन नेत्यांतील अंतर्गत शीतयुध्दामुळे राष्ट्रवादीची पुरती वाताहात झाली. सर्वपक्षीय महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असताना ही आघाडीच आकारास येऊ नये, यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती. ए. वाय. पाटील यांची नाराजी महाआघाडीला महागात पडू शकते. त्यांच्या गटाकडे किमान चार ते पाच हजार मते आहेत. राष्ट्रवादी एकसंधपणे सामोरे गेली असती तर कॉँग्रेससमोर अडचणी वाढल्या असत्या. या उलट कॉँग्रेसने राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू ठेवत आपले पॅनेल बांधणी केली. हळकुंडात नवरी मोडून (जागा वाटपात) पी. एन. पाटील यांनी काही अपवाद वगळता ताकदीचे पॅनेल बांधले. कॉँग्रेस मध्येही काही अलबेल होते असे नाही, पण पाटील यांनी बंडोबांना थंड करण्यात यश मिळवले. त्यात स्वता रिंगणात उतरल्याने पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठीची निवडणूक झाली आहे. सदाशिव चरापले यांनी परिवर्तन’च्या माध्यमातून दोन्ही कॉँग्रेसवर हल्ला चढविला आहे. पण त्यांची एकाकी झुंजीला सभासद कसा प्रतिसाद देतात यावरच निवडणूकीचे चित्र अवलंबून आहे. ‘पी.एन’यांच्या उमेदवारींने कार्यकर्त्यात संचार
पी. एन. पाटील यांनी यापुर्वी ‘भोगावती’चे नेतृत्व केले पण स्वता कधीच रिंगणात राहिले नाहीत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता पाटील यांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा राहिला, त्याला पाटील यांनी मान दिल्याने कार्यकर्ते झपाटल्यासारखा प्रचारयंत्रणेत दिसत आहेत.विधानसभेची पायाभरणीआगामी विधानसभेची पायाभरणी म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जाते. येथूनच सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत.