शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बावडेकरांनीही जोडलं रक्ताचं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:17 AM

कसबा बावडा : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं ‘लोकमत’च्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिर शनिवारी कसबा बावडा-लाइन बझार ...

कसबा बावडा : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं ‘लोकमत’च्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिर शनिवारी कसबा बावडा-लाइन बझार येथील त्र्यंबोली लॉन येथे घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ५३ रक्तदात्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून बावड्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील यांच्या हस्ते व माजी नगरसेवक मोहन सालपे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम, एस.जे. फाउंडेशनचे संदीप जाधव, संजना जाधव, बालाजी डेकोरेशनचे निवास जाधव, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे विनायक कारंडे, सचिन पाटील, विक्रम चहाचे रणजित पाटील उपस्थित होते.

एस.जे फाउंडेशनचे संदीप जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळात सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा वेळी ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचे आयोजन करून खऱ्या अर्थाने रक्ताचे नाते जोडले आहे. या रक्तदान शिबिरामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटनानंतर दिवसभर रक्तदानासाठी नागरिकांची गर्दी होत होती. बावडा-लाइन बझारबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी रक्तदान करून या अभियानात आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या ज्ञानशांती रक्तपेढीचे डॉ. बी.जी. कांबळे, नेहा चोथे, संदीप तोंदले, नजीर जमादार, मनीष सकटे, सचिन पाटील, विराजक कोळी यांचे सहकार्य लाभले. यावेळी विजय उलपे, धनाजी गोडसे, विलास पिंगळे, सुधाकर कसबेकर, संतोष ठाणेकर, विजय बेडेकर, प्रवीण लाड, सचिन पाटील, प्रमोद पाटील, मनोहर माळी, महादेव लांडगे, माजी नगरसेविका माधुरी लाड, वनिता बेडेकर, बुद्धिवान कदम, महंमद शेख, किरण तोरस्कर आदींसह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरासाठी छावा मित्रमंडळ, पद्मा पथक, त्र्यंबोली प्ले कॉर्नर, शिवतेज तरुण मंडळ, श्री कॉलनी मित्रमंडळ, तडाखा तालीम, हनुमान ब्लेसिंग स्पोर्ट्स, मराठा वॉरियर्स, शिवनेरी मित्रमंडळ, डॉल्फिन ग्रुप, जगदंब ग्रुप, उत्कर्ष मित्रमंडळ, मानसिंग बोंद्रे फाउंडेशन, डी.बी. बॉइज, अमित संकपाळ अकॅडमी, राहुल गावडे फाउंडेशन, मराठा कॉलनी फ्रेंड सर्कल, अष्टेकरनगर तरुण मंडळ, शिवप्रेमी मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले.

चौकट : पोलिसांचाही सहभाग

रक्तदान शिबिराला पोलिसांनीही चांगला प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरात अनेक पोलिसांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.

यांनी केले रक्तदान...

‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तदाते :

प्रशांत आनंदराव घाडगे, रोहित भास्कर कदम, रणजित श्यामराव घाटगे, नूरमोहम्मद अल्लाबक्ष सय्यद, सुरेखा सतीश खाडे, धनंजय आकाराम परब, शुभम रवींद्र जाधव, राहुल मालोजी भोसले, विष्णू विश्वास पाटील, दीपक सुनील मोहिते. मनीषा शरद शिंदे, सोहेल अमित शेख, राहुल चिकोडीकर.

‘ए’ पॉझिटिव्ह रक्तदाते :

सुनील सुकुमार घुमाई, दीपक सदानंद हेगडे, सचिन कृष्णा नाईक, वर्षा सुधीर पाटोळे, संकेत बाळकृष्ण घागरे, मदन मारुतराव तोरस्कर, अर्जुन महादेव जाधव, गौरव सुनील वाळेकर, राहुल विलास गावडे, सोहिल नूरमोहम्मद सय्यद, अक्षय अरविंद जाधव, अजय राजेंद्र संकपाळ, मौसमनूर मोहम्मद सय्यद, संदीप विठ्ठल जाधव, वैभव संतोष इंगळे, अक्षय प्रदीप गवळी.

'ए' 'बी' पॉझिटिव्ह रक्तदाते :

विशाल अंगड चौगुले, दीपाली गजमल भैरम, अक्षया शशिकांत जाधव, नितीन मनोहर जाधव.

'बी' पॉझिटिव्ह रक्तदाते :

दीपक विलास जाधव, अमोल प्रकाश पवार, अवधूत विष्णुकांत करवाडे, सानिका संदीप जाधव, सानिका अमित पवार, वैभव अरविंद बनकर, राकेश जयवंत भोसले, सतीश विठ्ठल खाडे, राजन नामदेव बिरांजे, विशाल आनंदराव जाधव, प्रवीण नंदकुमार भंडारी, दिलीप शिवाजी कारंडे, सौरभ संजय वाईंगडे, नीलेश अरविंद पाटील, श्रेयस संजय शिंदे, जयश्री अनिल पाटील, अजय रमेश घाडगे, ऋषिकेश संपत पवार, दीपक अप्पासाहेब सातवेकर, शफीमोहम्मद दस्तगीर शेख.

फोटो : ०३ बावडा रक्तदान शिबिर

‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’च्या वतीने शनिवारी कसबा बावडा त्र्यंबोली लॉन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी धनाजी गोडसे, आनंदराव पोवार, महंमद शेख, श्रीराम सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, व्हा. चेअरमन संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, हिंदू समाज सरपंच लक्ष्मण गायकवाड, प्रवीण लाड, सचिन पाटील, सुधाकर कसबेकर, रामकृष्ण जाधव, मनोहर माळी, विलास पिंगळे, विजय उलपे. उभे राहिलेले डावीकडून संदीप सावंत, निवास जाधव, महादेव लांडगे, विजय बेडेकर, संदीप जाधव, संतोष ठाणेकर, संजय लाड, अविनाश सावंत, गणेश पोवार, इजाज शेख, नितीन घाडगे, संजय डोंगरे, संजना जाधव, सारिका पोवार, सुमन जाधव, सुनीता पोवार, जास्मिन पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी रक्तदान करताना धनंजय परब व राहुल गावडे.

(फोटो: सिद्धी जाधव )