शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

ध्येयवेडे व्हा, कष्टाला कधी लाजू नका

By admin | Published: March 06, 2017 12:42 AM

‘अभिग्यान’मधून प्रेरणा : डी. एस. कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्यासह दिग्गजांनी साधला संवाद; ‘केआयटी’चा उपक्रम

कोल्हापूर : ध्येयवेडे व्हा. पैसा जरूर कमवा; मात्र समाजासाठीदेखील योगदान द्या. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका, असा प्रेरणादायी सल्ला देत उद्योग-व्यवसाय, चित्रपट, सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांनी रविवारी केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१७’मध्ये उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, उद्योजक मिलिंद कांबळे, व्यंकटेश अय्यर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार या दिग्गज मार्गदर्शकांच्या यशकथांतून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात सकाळी दहा वाजता उद्योजक व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते ‘अभिग्यान इंटरनॅशनल स्टुडंट्स कॉन्फरन्स’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक अय्यर म्हणाले, भारतीय लोक देशी खाद्यपदार्थांनाच अधिक पसंती देतात, ते ओळखून ‘गोली वडा’ची सुरुवात केली. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वी ठरलो. कोणताही व्यवसाय करा; मात्र त्यात गुणवत्ता राखा, अनावश्यकपणा टाळा. समोर येणाऱ्या आव्हानांना धाडसाने सामोरे जा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अभिनेते अनासपुरे म्हणाले, आजच्या तरुणाईने रिल हिरो आणि रिअल हिरोतील फरक समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, सामाजिक व्यवस्था, आदींसह प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगुलपणा, समंजसपणा, बारकाईने बघितले पाहिजे. सकारात्मकतेची साखळी सुरू ठेवावी. तरुणांनी ठरविले तरच मोठा बदल घडू शकतो; कारण त्यांच्यात मोठी ऊर्जा आहे. सण-उत्सवांना बाजारी रूप आणून त्यांत रममाण होणे टाळावे. ध्येयवेड्या लोकांचा आदर्श घ्या. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे; मात्र तो किती कमवायचा हे ठरवा. आयुष्यातील काही वेळ निवांत राहा, समाजासाठी काम करा. ‘नाम’ संस्था यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणार आहे. उद्योगपती कुलकर्णी म्हणाले, छोट्या-छोट्या गोष्टी, अनुभवांतून स्वत:चे करिअर घडविले. आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जा. आपल्या दोन हातांचा उपयोग नोकरीसाठीच्या विनवणीकरिता करू नका. उद्योग-व्यवसायाद्वारे या हातांची जादू दाखवा. आयुष्यात भांडण टाळा, आरोग्य जपा, सकारात्मक राहा. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका. उद्योजक कांबळे म्हणाले, मागासवर्गीय समाजातील युवकांना ‘दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून नोकरी, राजकारण सोडून उद्योजकतेचा मार्ग दाखवून दिला आहे. शिक्षण घेतानाच आयुष्यात काय करायचे हे ठरवा. पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यावर भर द्या. उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञान, माहितीच्या स्रोतांचा योग्य वापर करा. कौशल्य विकास साधा. या कार्यक्रमास ‘केआयटी’चे उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रॉडक्शनचे प्रमुख ए. एम. पिसे, अधिष्ठाता प्रीती पाटील, ‘वॉक विथ वर्ल्ड’चे समन्वयक प्रा. हर्षद ठाकूर, आदींसह विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)