सरूड येथील चौंडेश्वरी मंदिरात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुंभार समाज संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. कातवरे पुढे म्हणाले, समाजाच्या न्याय व हक्कांसाठी समाजबांधवांनी संघटितपणे लढा देण्याची गरज आहे.
प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार म्हणाले, संघटित समाजाशिवाय आपल्या मागण्यांची पूर्तता होणार नाही. मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. यावेळी संघटनेचे युवा अध्यक्ष उत्तम कुंभार, जयराम कुंभार, संजय कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पी. एस. आय.पदी निवड झाल्याबद्दल मलकापुरातील रोहन कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सतीश बाचणीकर, बबन वडणगेकर, संभाजी माजगावकर, संभाजी ठाणेकर, मनोहर पाडळकर, बाळासाहेब कुंभार, रवी कुंभार, नितीन माजगावकर, कृष्णात कुंभार, ए. जी. कुंभार, विनायक कुंभार, पुंडलिक कुंभार, महादेव कुंभार, आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष अशोक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. दिग्विजय कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कुंभार यांनी आभार मानले.