लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : हंगाम २०१६/१७ मध्ये गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता देण्याची लगबग सहकारी साखर कारखान्यांकडून सध्या सुरू आहे. पण जिल्ह्यातील काही खासगी कारखान्यांनी दुसºया हप्त्यासाठी ‘ब्र’ शब्दही काढलेला नसल्याने त्यांच्याबाबत शेतकरी संघटना आता काही भूमिका घेणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.२०१६/१७ चा हंगाम संपून सहा महिने झाले. हंगामाच्या सुरूवातीला एफआरपी अधिक १७५ असा एकरकमी दर देण्यावरून साखर कारखानदार, शासन आणि शेतकरी संघटना यांच्यात एकमत झाले होते. त्यावेळी शेतकरी संघटना या समझोत्यालाही मान्यता देण्यास कबूल नव्हती. पण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दर तीन महिन्याला साखरेच्या दराचा आढावा घेऊ व रंगराजन समितीच्या ७०/३० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अधिकचा दर निघल्यास तो सर्व कारखान्यांना देण्यास भाग पाडू, असे अश्वासन दिले होते. मात्र हंगाम संपल्यानंतर याकडे ना पालकमंत्र्यांनी लक्ष दिले ना कारखानदारांनी. स्थानिक शेतकरी व सत्ताधारी गटाच्या विरोधात काम करणाºयांनी गेल्या दोन महिन्यांपासून दुसºया हप्त्यासाठी मोर्चे, निवेदने देऊन वातावरण तापवले होते. त्यामुळे दोन खासगी आणि काही सहकारी साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता दिल्याने ऊस पुरवठा करणारे शेतकरी सुखावले.मात्र, चांगला दर मिळेल व लवकर पैसे मिळतील म्हणून ज्या शेतकºयांनी खासगी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला आहे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. जिल्ह्यातील सहा खासगी कारखान्यांनी दुसºया हप्त्यासाठी ‘ब्र’ शब्दही काढलेला नाही. आपल्याला कोण विचारत नाही, असा समज या कारखानदारांचा झाला आहे. यामुळे संघटना दुसºया हप्त्यासाठी त्यांंना जाब विचारणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पहिला हप्ता पीक कर्जाला गेला असून, आता खरीपसाठी व आडसाली लागणीला शेतकºयांना पैशाची गरज आहे. त्यामुळे दुसरा हप्ता कधी जाहीर करणार याकडे ऊस पुरवठा करणाºया शेतकºयांचे लक्ष लागले आहे.या कारखान्यांनी दिला दुसरा हप्तासर्वप्रथम बिद्री साखर कारखान्याच्या प्रशासकांनी १२५ प्रति टन असा दुसरा हप्ता देऊन प्रथमच उसाच्या दराने तीन हजारांचा टप्पा गाठला. यानंतर जवाहर, हुपरी, कुंभी कासारी-कुडित्रे, शरद-नरंदे, शाहू-कागल, दत्त-शिरोळ, राजाराम-कसबा बावडा, वारणा, संताजी घोरपडे या सहकारातील नऊ कारखानदारांनी तर गुरुदत्त-टाकळी, दालमिया-आसुर्ले पोर्ले या खासगी कारखान्याने दुसरा हप्ता जाहीर करून शेतकºयांना दिला आहे.सध्या खरीप हंगाम जोरात सुरू आहे. मशागत, खते, बियाणे सणासुदीसाठी शेतकºयांना पैशाची गरज आहे. सहकारी कारखान्यांनी दुसरा हप्ता जाहीर केला आहे. पण खासगी कारखानदार आपल्याला कोण विचारत नाही, असा समज करून घेत आहेत. आम्ही दोन दिवसांत दालमिया कारखान्याला निवेदन देऊन दराबाबत विचारणा करणार आहोत.- पंढरीनाथ पाटील (वाकरे, शेतकरी संघटना)
खासगी कारखान्यांचा दुसºया हप्त्यासाठी ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:44 PM